11 हजारापेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी भरला पसंतीक्रम

online-education
online-education

पुणे - इयत्ता 11वीच्या प्रवेशासाठी आजपासून (बुधवार) अर्जाचा भाग दोन म्हणजेच पसंतीक्रम भरण्यास सुरूवात झाली आहे. पहिल्याच दिवशी सायंकाळी सात पर्यंत पुणे व पिंपरी-चिंचवड शहरातील जवळपास 11 हजार 656 विद्यार्थ्यांनी महाविद्यालयांची पसंतीक्रम नोंदविला आहे.

पुणे व पिंपरी-चिंचवड शहरात इयत्ता 11वीसाठी केंद्रीय पद्धतीने ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबविली जाते. यंदा पुण्यामध्ये 304 महाविद्यालयात 1 लाख 6 हजार 972 इतकी प्रवेश क्षमता आहे. इयत्ता 10वीचा निकाल जाहीर झाल्यानंतर अकरावी ऑनलाईन प्रवेश नियंत्रण समितीने 1 ऑगस्टपासून प्रवेश अर्जाचा भाग एक भरण्याची प्रक्रिया सुरू केली. गेल्या 12 दिवसात जवळपास 93 हजार 987 जणांनी नोंदणी केली असून, 70 हजांनी 294 जणांनी भाग एक भरला आहे. आवडीच्या महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांना पसंगीक्रम नोंदविणे आवश्‍यक आहे. त्यासाठी आजापासून (ता.12) पहाटे 5 पासून ही लिंक उघडण्यात आली. विद्यार्थी व पालकांनी पहिल्याच दिवशी चांगला प्रतिसाद दिला आहे. सायंकाळी पाच वाजता अर्जाचा भाग दोन भरण्याचा अकडा 10 हजार 500 इतका होता, पण पुढच्या दोन तासात एक हजारापेक्षा जास्त जणांनी अर्ज भरून 11 हजार 656 पर्यंत गेला होता.

अभिजीत कुलकर्णी म्हणाला, ""पसंतीक्रम भरताना कोणतीही अडचण आली नाही. अवघ्या काही मिनीटांमध्ये मला हवे असलेले महाविद्यालय निवडून पसंतीक्रम भरला आहे. आता पहिल्या फेरीची यादी जाहीर होण्याची वाट पहात आहे.''

विद्यार्थ्यांचा वॉट्‌सऍप ग्रुप
इयत्ता 10वीमध्ये उत्तीर्ण झाल्यानंतर 11वी प्रवेशाची माहिती देवाण घेवाण करण्यासाठी विद्यार्थ्यांनी त्यांच्या मित्रांचा वाटॅसऍप ग्रुप तयार केला आहे. त्यावरून ते कोणत्या महाविद्यालयाला पसंतीक्रम द्यायचा, गेल्यावर्षीचा कटऑफ काय होता?, अर्ज भरताना अडचणी आल्या की नाही यावर ते चर्चा करत आहेत, असेही पालकांनी सांगितले.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com