धक्कादायक : पुण्याचं हवामान होतंय‘एक्स्ट्रीम’; ऊन, पाऊस, थंडी सगळंच होतंय अती

योगीराज प्रभुणे
शनिवार, 1 ऑगस्ट 2020

सर्वाधिक पाऊस, उचांकी कमाल तापमान आणि निचांकी किमान तापमानाची नोंद 2019मध्ये पुण्यात झाली, असे तीनही ऋतूंचे रौद्र रूप पुण्याने गेल्या वर्षी अनुभवले.

पुणे : पुणेकरांना गेल्या वर्षी मुसळधार पावसाने झोडपलेच, पण उन्हाच्या चटक्याने भाजून काढले आणि कडाक्याच्या थंडीने हाडे गोठवली. सर्वाधिक पाऊस, उचांकी कमाल तापमान आणि निचांकी किमान तापमानाची नोंद 2019मध्ये पुण्यात झाली, असे तीनही ऋतूंचे रौद्र रूप पुण्याने गेल्या वर्षी अनुभवले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

Image may contain: text that says "1600.00 1400.00 पुण्यात पडलेला पाऊस (सर्व आकडे आकडे मिलीमीटरमध्ये) 1200.00 1000.00 1411.00 829.20 800.00 921.00 600. 672.90 400.00 200.00 490.10 0.00 2015 2016 2017 2018 2019"

पुण्यात 29 वर्षातील सर्वाधिक पाऊस गेल्या वर्षी पडला. शहरात 2018 च्या तुलनेत सुमारे तिप्पट पाऊस कोसळला. त्यामुळे पुणेकरांनी सहा महिने पावसाळा अनुभवला. पुण्यात गेल्या वर्षभरात म्हणजे 2019 मध्ये एक हजार 411 मिलीमीटर पाऊस कोसळला. शहरात 1990 पासून पडलेला हा सर्वाधिक पाऊस होता. शिवाजीनगर येथे 2018 मध्ये 490.10 मिलीमीटर पावसाची नोंदला होता. त्याच्या तुलनेत गेल्या वर्षी जवळपास तिप्पट पाऊस शहरात कोसळला, अशी माहिती पुणे महापालिकेने प्रसिद्ध केलेल्या पर्यावरण अहवालात प्रसिद्ध केली आहे. 

कोरोनाची साथ असताना, दुसरीकडे एक लाखाहून अधिक ज्येष्ठांना अन्य आजार

शहरात 1990 मध्ये सुमारे 900 मिलीमीटर पाऊस पडला होता. त्यानंतर 2003 पर्यंत 1991 आणि 1997 या दोन वर्षांचा अपवाद वगळता तेरा वर्षे हजार मिलीमीटरचा टप्पा ओलांडला नव्हता. तसेच, 2004 ते 2019 या पंधरा 2005, 2006, 2010 या तीन वर्षांमध्ये हजार मिलीमीटरपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली. उर्वरित वर्षांमध्ये 500 ते 900 मिलीमीटर पाऊस नोंदला. मात्र, गेल्या वर्षी 29 वर्षांमधील उचांकी पाऊस पडला. 

सहा महिने पावसाळा
शहरात गेल्या जूनपासून सुरू झालेला पाऊस नोव्हेंबरअखेरपर्यंत सुरू होता. यात जुलैमध्ये सर्वाधिक पावसाची नोंद झाली. त्या महिन्यात 376.9 मिलीमीटर पाऊस पडला. 

आयटीआय प्रवेश प्रक्रिया आजपासून सुरू; ऑनलाईन अर्ज भरता येणार 

असा रचला पावसाने नवीन उच्चांक 
Image may contain: text that says "सकाळ असा रचला पावसाने नवीन उच्चांक (सर्व आकडे मिलीमीटरमध्ये) जून 197.9 जुले ऑँगस्ट 376.9 208.4 स्टेंबर 287.7 ऑँक्टोबर 234.9 नोव्हेंबर 102.7"

सर्वाधिक आणि निचांकी तापमान
शहरात गेल्या वर्षी 29 एप्रिल रोजी कमाल तापमानाचा नवा उचांकी नोंदला. त्या दिवशी कमाल तापमानच्या पाऱयाने 43 अंश सेल्सिअसपर्यंत उसळी मारली. पुण्यात 9 फेब्रुवारीला सर्वात कमी म्हणजे 5.1 अंश सेल्सिअस तापमान नोंदले. हे 1989 पासूनचे निचांकी किमान तापमान होते. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pune people experience Extreme Weather last year