पुणे : बिबवेवाडीत भर रस्त्यावर सत्तावीस लाखांची चोरी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 26 मार्च 2018

पुणे- सुट्ट्यांमुळे पेट्रोल पंपाकडे साठलेली रोख रक्कम पंपाचे कर्मचारी सोमवारी बॅंकेत भरण्यासाठी घेऊन जात होते. त्यावेळी भर दुपारी बंदुकीचा धाक दाखवून दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी ही रक्कम पळविली. ही घटना बिबवेवाडी-कोंढवा रस्त्यावर घडली. भर दुपारी आणि वर्दळ असलेल्या रस्त्यावर घडलेल्या या दरोड्यामुळे परिसरात घबराट पसरली. 

के.के. मार्केटजवळील नारवाण पेट्रोल सर्व्हिस स्टेशनकडे शनिवारी व रविवारी दोन दिवस जमा झालेली रोख रक्कम भवानी पेठेतील एका बॅंकेमध्ये भरण्यासाठी पंपाचा एक कर्मचारी व व्यवस्थापक वॅगनआर गाडीमध्ये घेऊन चालले होते. पंपावरून निघून महेश सोसायटी मार्गे बिबवेवाडी-कोंढवा रस्त्यावरील लाइट हाउस मॉलसमोर आले. त्यावेळी पाठीमागून आलेल्या सीबीझेड या दुचाकीवरील एकाने वॅगनआर गाडीसमोर आपली गाडी आडवी लावली. त्याचवेळी दुसऱ्या दुचाकीवरील दोघांनी वॅगनआर गाडीच्या खिडकीजवळ थांबून आतमध्ये रोख रकमेची बॅग घेऊन बसलेल्या कर्मचाऱ्यास बंदुकीचा धाक दाखवीत आणि त्याच्यावर कोयत्याने वार करून त्याच्याकडील बॅग घेतली. 

पैसे हाती लागल्यानंतर चोरट्यांनी पडलेली दुचाकी त्याच ठिकाणी सोडून दुसऱ्या दुचाकीवर पळ काढला. चोरटे गंगाधम चौकाच्या दिशेने गेल्याचे प्रत्यक्षदर्शीही सांगितले.

दरम्यान, दिवसाढवळ्या घडलेल्या या दरोड्याच्या घटनेमुळे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी भेट दिली. परिमंडळ दोनचे पोलिस उपायुक्त प्रवीण मुंढे, गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त पंकज डहाणे, स्वारगेट विभागाचे सहायक पोलिस आयुक्त शिवाजी पवार यांच्यासह वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी करून पुढील चौकशीचे आदेश दिले.

Web Title: pune petrol pump cash robbery