Pune:मद्यधुंद अवस्थेतील दुचाकी चालकाला वाचवताना केळीने भरलेला पिकअप पलटी

गुरवार (ता.13) रोजी सायंकाळी 7 च्या दरम्यान जेऊर (ता.करमाळा) येथून केळी भरून पिकअप क्रं. MH 45AF 5429 घेऊन चालक ऋषिकेश पोपट वाघमारे हे मुंबईच्या दिशेने निघाले होते.
pune
punesakal

इंदापूर- शहरातील पुणे सोलापूर महामार्गावर हॉटेल रेणुका समोर एका मद्यधुंद अवस्थेतील दुचाकी चालकाला वाचविताना झालेल्या अपघातात केळी ने भरलेला पिकअप उलटून वाहनाचे नुकसान झाले यामध्ये दुचाकीस्वार जखमी झाला आहे.

गुरवार (ता.13) रोजी सायंकाळी 7 च्या दरम्यान जेऊर (ता.करमाळा) येथून केळी भरून पिकअप क्रं. MH 45AF 5429 घेऊन चालक ऋषिकेश पोपट वाघमारे हे मुंबईच्या दिशेने निघाले होते.

pune
Mumbai News : महिला किंवा पुरुष पोलिसांनी हात लावू नये; तृतीयपंथीयांचा गोंधळ, पोलिसांसमोर पेच

यावेळी प्रत्यक्षदर्शिने सांगितलेल्या माहितीनुसार एक दुचाकी स्वार मद्यधुंद अवस्थेत दुचाकी क्रमांक MH 11 CS 5257 घेऊन वाहतुकीचे नियम न पाळता दुचाकी वर नियंत्रण न ठेवता चालला होता. यावेळी अचानक वळण घेत विरुद्ध दिशेने पिकअपच्या समोर आला.

यावेळी दुचाकीला वाचवण्याच्या प्रयत्नात केळीने भरलेला पिकप पलटी झाला तर दुचाकीस्वार बाजूला पडत जखमी झाला यामध्ये दुचाकी तसेच पिकअप चे नुकसान झाले आहे. दरम्यान सोलापूर पोलिसांनी घटनास्थळी भेट देत वाहतूक सुरळीत केली.दुचाकी चालविणाऱ्या मद्यधुंद जखमी चालकाचे नाव समजू शकले नाही.

इंदापूर येथील पुणे सोलापूर महामार्गावर मद्यधुंद दुचाकी चालकाला वाचविण्याच्या प्रयत्नात पलटी झालेला केळीने भरलेला पिकअप.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com