पुणे पिंपरी-चिंचवडचा संपर्क तुटला; 'या' पुलांवरील वाहतूक बंद

पांडुरंग सरोदे
सोमवार, 5 ऑगस्ट 2019

पुणे व पिंपरी चिंचवडला जोडणाऱ्या तिन्ही मुख्य पुलावरील वाहतूक बंद पडल्याने संपर्क तुटला आहे. सांगवी-स्पायसर, औंधमधील राजीव गांधी पुल व सांगवी फाटा-डिमार्ट पुल हे तिन्ही पुल पुणे व पिंपरी-चिंचवड या दोन्ही शहराना जोडणारे प्रमुख पुल आहेत.

पुणे : पुणे व पिंपरी चिंचवडला जोडणाऱ्या तिन्ही मुख्य पुलावरील वाहतूक बंद पडल्याने संपर्क तुटला आहे. सांगवी-स्पायसर, औंधमधील राजीव गांधी पुल व सांगवी फाटा-डिमार्ट पुल हे तिन्ही पुल पुणे व पिंपरी-चिंचवड या दोन्ही शहराना जोडणारे प्रमुख पुल आहेत.
aundh
मुळा नदीला पुर आल्याने तिन्ही महत्वाचे पुल वाहतूकीसाठी बंद करण्य़ात आले आहेत. त्यामुळे या दोन्ही शहरात दररोज लाखोच्या प्रमाणात नोकरी, उद्योग व व्यावसायानिमित जाणाऱ्या वर्गावर परिणाम झाला आहे. विशेषत: हिंजवडी आयटी पार्क मध्ये कामाला जाणारा लोकांवर याचा सर्वाधिक परिणाम झाला आहे.

traffic
अनेक आयटी कंपन्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांना 'वर्क फ्रॉम होम' करण्यास सांगितले आहे. दरम्यान, पुणे व पिंपरी चिंचवड शहरामध्ये दररोज कामानिमित ये-जा करणाऱ्या लाखो लोकांवर वाहतूक कोंडीचा परीणाम झाला आहे. पर्यायी मार्गावरील पुलांवर ताण आल्याने वाहतूक कोंडी वाढली आहे.
Image may contain: one or more people, people walking, crowd, motorcycle, sky, outdoor and nature

 हे तीन मुख्य पुल वाहतूकीसाठी बंद
- सांगवी ते स्पायसर कॉलेजला जोडणारा पुल पाण्याखाली गेला आहे. तसेच औंधमधील राजीव गांधी पुलाला पाणी लागले आहे. त्यामुळे वाहतूक अतिशय संथ गतीने सुरु आहे. 

- सांगवी फाटयावरुन डिमार्टच्या दिशेने जाणाऱ्या पुलावरही वाहतूक कोंडी झाली आहे. त्यामुळे हिंजवडी येथे जाणाऱ्या आयटीयन्सची तारांबळ उडाली आहे.

- औंध-सांगवी रस्त्यावरील महादजी शिंदे पुल खचल्याने खड्डा झाला आहे. अपघाताचा धोका निर्माण झाल्याने वाहनचालकांनी सुरक्षितपणे जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 

Bridge


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pune Pimpri-Chinchwad Contact lost