पिंपरीत तरुणीवर सामूहिक बलात्कार; तिघांना अटक

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 26 मे 2017

एक दिवस त्याने शीतपेयातून गुंगीचे औषध देऊन बलात्कार केला. त्यानंतर ही माहिती त्याने त्याच्या इतर तीन मित्रांना दिली. या तिघांनी तिच्यावर सामुहिक बलात्कार केला. या तीन मित्रांच्या ओळखीने अन्य मुलांनीही तिच्यावर बलात्कार केला.

पिंपरी : येथील अजमेरा कॉलनीमध्ये राहण्यास आलेल्या 21 वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. या प्रकरणी तिघांना पिंपरी पोलिसांनी अटक केली, एक महिन्यापूर्वी या तरूणीवर वेळोवेळी बलात्कार झाला होता.

सौरभ शेट्टी, नसीब खान, हर्षल भाटिया, अशी असे अटक केलेल्यांची नावे आहेत. आजीच्या शेजारी राहत असलेल्या तरुणाशी पीडित तरुणीची ओळख झाली होती. तो तिला फिरायला घेऊ जात असे. एक दिवस त्याने शीतपेयातून गुंगीचे औषध देऊन बलात्कार केला. त्यानंतर ही माहिती त्याने त्याच्या इतर तीन मित्रांना दिली. या तिघांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. या तीन मित्रांच्या ओळखीने अन्य मुलांनीही तिच्यावर बलात्कार केला.

या सर्व प्रकारातून तरुणी आजारी पडल्याने आजीने तिला नेरळला तिच्या गावी नेऊन सोडले. घरच्यांनी तिला रुग्णालयात नेले. तेव्हा तिच्यावर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना उघड झाली. या प्रकरणी नेरळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. हा गुन्हा गुरुवारी (ता. 25) पिंपरी पोलिसांकडे वर्ग केला असून पिंपरी पोलिस तपास करीत आहेत.

Web Title: pune pimpri news gang rape on young girl