

PMC Additional Commissioner Sets Waste Management Targets
Sakal
पुणे : ओला- सुका कचरा वर्गीकरण करून, ओला कचरा जागेवरच जिरवा, नागरिकांकडून सातत्याने कचरा टाकण्यात येणाऱ्या ठिकाणांचे (क्रॉनिक स्पॉट) सर्वेक्षण करून अशी ठिकाणे पुढील एक महिन्यात बंद करा आणि शहर स्वच्छतेला महत्त्व देत दर महिन्याला सर्वंकष स्वच्छता मोहीम राबवा, अशा सूचना महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त पवनीत कौर यांनी शनिवारी घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या बैठकीत दिल्या.