PMP Bus : पीएमपी बस घडविणार धार्मिक, पर्यटन स्थळांची सफर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Jejuri

प्रवाशांना आता ‘पीएमपी’द्वारे धार्मिक व पर्यटन स्थळांची सफर घडणार आहे. दर आठवड्याच्या शनिवारी व रविवारी, तसेच शासकीय सुटीच्या दिवशी ही बस प्रवाशांच्या सेवेत धावणार आहे.

PMP Bus : पीएमपी बस घडविणार धार्मिक, पर्यटन स्थळांची सफर

पुणे - प्रवाशांना आता ‘पीएमपी’द्वारे धार्मिक व पर्यटन स्थळांची सफर घडणार आहे. दर आठवड्याच्या शनिवारी व रविवारी, तसेच शासकीय सुटीच्या दिवशी ही बस प्रवाशांच्या सेवेत धावणार आहे. एक मेपासून ‘पीएमपी’च्या सात पर्यटन बससेवा सुरू होत आहेत. इलेक्ट्रिक वातानुकूलित बसचा वापर केला जाणार असून, यासाठी प्रवाशांना सातशे ते हजार रुपये मोजावे लागतील.

पर्यटन बससेवा क्र. १

 • कुठे जाणार : मोरगाव, जेजुरी, सासवड

 • बस सुटण्याची वेळ : सकाळी ०९:००

 • बस पोहोचण्याची वेळ : दुपारी ०४:००

 • पहिला व शेवटचा थांबा : हडपसर गाडीतळ

 • प्रतिप्रवासी तिकीट दर : रुपये १,०००/-

पर्यटन बससेवा क्र. २

 • कुठे जाणार : सासवड सोपानकाका मंदिर, संगमेश्वर मंदिर, नारायणपूर, बालाजी मंदिर (केतकावळे), बनेश्वर मंदिर, कोंढणपूर मंदिर

 • बस सुटण्याची वेळ : सकाळी ०९:००

 • बस पोहोचण्याची वेळ : सायंकाळी ०६:३०

 • पहिला व शेवटचा थांबा : हडपसर गाडीतळ

 • प्रतिप्रवासी तिकीट दर : रुपये १,०००/-

पर्यटन बससेवा क्र. ३

 • कुठे जाणार : खारावडे म्हसोबा देवस्थान, टेमघर धरण, निळकंठेश्वर पायथा

 • बस सुटण्याची वेळ : सकाळी ०९:००

 • बस पोहोचण्याची वेळ : सायंकाळी ०५:००

 • पहिला व शेवटचा थांबा : डेक्कन जिमखाना

 • प्रतिप्रवासी तिकीट दर : रुपये १,०००/-

पर्यटन बससेवा क्र. ४

 • कुठे जाणार : खडकवासला धरण, पानशेत धरण, वरसगाव धरण

 • बस सुटण्याची वेळ : सकाळी ०९:००

 • बस पोहोचण्याची वेळ : दुपारी ०४:४५

 • पहिला व शेवटचा थांबा : पुणे स्टेशन बसस्थानक

 • प्रतिप्रवासी तिकीट दर : रुपये १,०००/-

पर्यटन बससेवा क्र. ५

 • कुठे जाणार : पुलगेट, हडपसर, रामदरा, थेऊर गणपती, प्रयागधाम

 • बस सुटण्याची वेळ : सकाळी ०९:००

 • बस पोहोचण्याची वेळ : सायंकाळी ०५:३०

 • पहिला व शेवटचा थांबा : पुणे स्टेशन बसस्थानक

 • प्रतिप्रवासी तिकीट दर : रुपये ७००/-

पर्यटन बससेवा क्र. ६

 • कुठे जाणार : वाघेश्वर मंदिर (वाघोली), वाडेबोल्हाई, छ. संभाजी महाराज समाधी मंदिर (वढू बुद्रुक),

 • रांजणगाव गणपती

 • बस सुटण्याची वेळ : सकाळी ०९:००

 • बस पोहोचण्याची वेळ : सायंकाळी ०५:३०

 • पहिला व शेवटचा थांबा : पुणे स्टेशन बसस्थानक

 • प्रतिप्रवासी तिकीट दर : रुपये १,०००/-

पर्यटन बससेवा क्र. ७

 • कुठे जाणार : भक्ती-शक्ती निगडी, अप्पू घर, इस्कॉन मंदिर (रावेत), मोरया गोसावी मंदिर, प्रतिशिर्डी (शिरगाव), देहूगाव, गाथा मंदिर, आळंदी

 • बस सुटण्याची वेळ : सकाळी ०९:००

 • बस पोहोचण्याची वेळ : सायंकाळी ०६:२०

 • पहिला व शेवटचा थांबा : निगडी भक्ती-शक्ती बसस्थानक

 • प्रतिप्रवासी तिकीट दर : रुपये ७००/-

वैशिष्ट्ये

बसच्या आसन क्षमतेनुसार पूर्ण ३३ प्रवाशांचे ग्रुप तिकीट काढल्यास पाच प्रवाशांना मोफत प्रवास. पर्यटन बसमधून प्रवास करण्यासाठी प्रवासी आपल्या घरापासून ते थांब्यापर्यंत व प्रवास संपून घरी जाण्यासाठी ज्या बसमधून प्रवास करेल, तो मोफत असेल. पर्यटन बसच्या तिकिटावर तो प्रवास मोफत करता येईल. प्रत्येक बसमध्ये गाईडची नेमणूक केली आहे.

टॅग्स :puneTouristPMP Bustrip