Indapur Accident Case : वालचंदनगर पोलिसांनी शोधली अपघातील चारचाकी गाडी व चालक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Indapur Accident Case

Indapur Accident Case : वालचंदनगर पोलिसांनी शोधली अपघातील चारचाकी गाडी व चालक

वालचंदनगर : जंक्शन (ता.इंदापूर) येथे मार्निंग वॉक साठी गेलेल्या दोन महिलांना धडक देवून पळून गेलेल्या चालकाला वालचंदनगर पोलिसांनी लातुरमधून ताब्यात घेतले असून त्याच्याकडून अपघातील वाहन जप्त केले आहे.

याप्रकरणी पोलिसांनी विकास तुकाराम गुरमे (रा.लातुर) याला ताब्यात घेतले असून त्याच्यावर भारतीय दंड संहिता ३०४ (अ) नुसार गुन्हा दाखल केला आहे. घटनेमध्ये अर्चना श्रीशैल सनमठ व अनिता शिवाजी शिंदे (रा.दोघी, आनंदनगर) यांचा बुधवार(ता.२२) रोजी मृत्यू झाल्याची घटना घडली होती.

वालचंदनगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार मंगळवार (ता.२१) राेजी रात्रीच्‍या सुमारास त्याच्या गुरमे हा ओमीनी गाडी घेवून लातुरहुन बारामतीला मुलाला भेटायला निघाला होता. बुधवारी (ता.२२) रोजी सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास जंक्शन जवळ झोपचे डुलका लागल्यामुळे भरधाव वेगाने जाणाऱ्या गाडीने अर्चना सनमठ व अनिता शिंदे (रा.दोघी, आनंदनगर) यांना पाठीमागून जोरदार ठोस दिली. गुरमे अपघातानंतर तो पाच-सहा मिनटे थांबुन लातुरला परत गेला.

पाेलिसांनी असा लावला तपास...

अपघातानंतर पोलिसांनी तातडीने सीसीटीव्ही तपासणी सुरु केली. अपघात झालेल्या ठिकाणापासुन जवळ असलेल्या किराणा मालाच्या दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये सनमठ व शिंदे या महिला हातामध्ये बॅटरी घेवून चालत जाताना दिसत होत्या. थोड्या वेळाने एक ओमिनी गाडीही रस्त्याने गेलेली दिसली.

मात्र तिचा नंबर दिसत नव्हता. पोलिसांनी गाडीचे फोटो व्हायरल करुन नागरिकांना संपर्क करण्याचे आवाहन केले.सरडेवाडीचा टोल नाक्यावरच्या सीसीटीव्ही तपासणी केल्यानंतर अपघात करुन चालली चारचाकी गाडी दिसल्यानंतर पोलिसांनी तांत्रिक तपासाद्वारे संबधित चालकाला व गाडीला ताब्यात घेतले.

पुणे जिल्हाचे पोलिस अधीक्षक अंकित गोयल, अतिरिक्त पोलिस अधीक्षक आनंद भोईटे, बारामतीचे उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली वालचंदनगर पाेलिस ठाण्याचे साहय्यक पोलिस निरीक्षक विक्रम साळुंखे, पोलिस उपनिरीक्षक अतुल खंदारे, दादासाहेब डोईफोडे, गुलाब पाटील यांनी गाडीचा शोध घेतला.

गोल्डन अव्हर मध्ये उपचार केले असते तर वाचले असते दोघींचे प्राण...

अपघातानंतर चालक पाच ते सात मिनिटे अपघातस्थळी थांबला होता. यावेळी अपघातील दोघी जखमी होत्या. मदतीसाठी ओरडत होत्या. मात्र चालक मदत करण्याऐवजी पळून गेला. १५ मिनिटांनी नागरिकांना अपघातीचा माहिती मिळाली. सुमारे अर्धा तास अॅब्युलस मिळाली नव्हती. तोपर्यत सनमठ यांचा मृत्यू झाला होता.

व अपघातानंतर सुमारे एक ते दीड तासानंतर अर्चना शिंदे यांना हाॅस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले होते.चालकाने दाेघींनाही तातडीने स्‍वत:च्या गाडीतून नेले असते तर दोघींना ही जीवदान मिळाले असते.