पु. ल. देशपांडे यांच्या घरी चोरी करणारा पोलिसांच्या ताब्यात

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 25 जून 2018

भांडारकर रस्त्यावर "मालती-माधव" नावाची एक इमारत आहे. या इमारतीमध्ये पु. ल. देशपांडे यांच्या सदनिका आहेत. पु. ल. यांचे शब्दसाहित्य व काही वस्तु एका सदनिकेत होत्या. नेमक्या याच सदनिकेत 19 डिसेंबरला पहाटे 2 वाजता चोरी झाली. शब्दसाहित्याचा मौल्यवान ठेव्याचे महत्व चोरटयास असन्याचे काहीच कारण नव्हते, त्यामुळे त्यास तेथून काही चोरावे वाटले नाही.

पुणे : आपल्या साहित्याने अवघ्या महाराष्ट्राला आपलेसे करणाऱ्या पु. ल. देशपांडे यांच्या घरी चोरीचा प्रयत्न करणाऱ्याला अखेर पोलिसांना शोध घेतला आहे. तब्बल सात महिन्यानंतर हा चोर पोलिसांच्या हाती लागला आहे. पु. ल यांच्या घराबरोबरच आणखी काही ठिकाणी ही या चोराने चोरी केल्याचे उघडकीस आले आहे. 

जितसिंग राजसिंग टाक (वय 24, रा. बिराजदार नगर, वैदुवाडी, हडपसर) असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. टाक याने त्याच्या तीन साथीदारांसमवेत पु. ल. देशपांडे यांच्या घरी चोरी केली होती.त्यापैकी एकजण यापूर्वीच्या एका गुन्हाप्रकरणी कारागृहात आहे. तर अन्य दोघाचा तपास पोलिस घेत आहेत.

भांडारकर रस्त्यावर "मालती-माधव" नावाची एक इमारत आहे. या इमारतीमध्ये पु. ल. देशपांडे यांच्या सदनिका आहेत. पु. ल. यांचे शब्दसाहित्य व काही वस्तु एका सदनिकेत होत्या. नेमक्या याच सदनिकेत 19 डिसेंबरला पहाटे 2 वाजता चोरी झाली. शब्दसाहित्याचा मौल्यवान ठेव्याचे महत्व चोरटयास असन्याचे काहीच कारण नव्हते, त्यामुळे त्यास तेथून काही चोरावे वाटले नाही.

सध्या अमेरिकेत वास्तव्य करणारे पुु. ल. यांचे भाचे दिनेश ठाकुर यांना ही घटना समजताच त्यांनी पुण्याकडे धाव घेतली. दरम्यान, सोसायटीमध्ये राहणार्या लोकांनी याबाबत पोलिसांना खबर दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थली धाव घेतली. पु.ल.यांच्या घरी चोरी झाली, ही बातमी अवघ्या महाराष्ट्रभर वाऱ्यासारखी पसरली आणि त्यानंतर मराठी साहित्यविश्व ढवलुन निघाले.

Web Title: Pune police arrested criminal who stole a house at PL Deshpande