बलात्कार प्रकरणी पतीच्या मित्रास अटक 

संदीप घिसे 
बुधवार, 11 जुलै 2018

पीडित महिलेच्या मुलाला जीवे मारण्याची धमकी देत बलात्कार व अनैसर्गिक कृत्य केले. तसेच ही घटना कोणाला सांगितल्यास तुझ्या पतीला सर्व सांगेल, अशी धमकीही दिली.

पिंपरी (पुणे) - मुलाला जीवे मारण्याची धमकी देत विवाहितेवर बलात्कार करणाऱ्या पतीच्या मित्रास पोलिसांनी अटक केली. ही घटना हिंजवडी जवळील मारूंजी येथे घडली.

वैभव गुलाब नारनवरे (वय 34, रा. अर्बन फॉरेस्ट स्टार सोसायटी, तुकारामनगर, मामुर्डी-किवळे, देहूरोड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत 27 वर्षीय विवाहितेने फिर्याद दिली आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा फिर्यादी महिलेच्या पतीचा मित्र आहे. 30 मार्च 2018 ते 9 जुलै 2018 या कालावधीत आरोपीने फिर्यादीचा लहान मुलगा घरी असतानाही लग्नाचे आमिष, अश्‍लील चित्रफीत दाखविली. शिवीगाळ करीत हाताने मारहाण केली. तसेच पीडित महिलेच्या मुलाला जीवे मारण्याची धमकी देत बलात्कार व अनैसर्गिक कृत्य केले. तसेच ही घटना कोणाला सांगितल्यास तुझ्या पतीला सर्व सांगेल, अशी धमकीही दिली. सहायक निरीक्षक गणेश धामणे याबाबत अधिक तपास करीत आहेत.

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: pune police arrested husbands friend in the rape case