पुणे : पोलिसांनी उधळला दरोड्याचा डाव

policem.jpg
policem.jpg

पुणे : कात्रज वडगाव बाह्यवळणावर पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या टोळीस भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली. रविवारी पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. याप्रकरणी पोलिसांनी चार जणांना अटक केली असून त्यांच्याकडून कोयते, दुचाकी असा सव्वा लाख रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. 

नीलेश राजू कुडले (वय 20), तेजस संदीप वाडकर (वय 20), सनी संजय साळवी (वय 20, तिघेही रा. पापळवस्ती, श्रीरामनगर, बिबवेवाडी), सनी दत्तात्रय बोरकर (वय 19, रा. व्हीआयटी शाळेजवळ, बिबवेवाडी) अशी अटक केलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कात्रज वडगाव बाह्यवळणावरील दत्तनगर रस्त्यावर असलेल्या रंगोली मार्बलजवळ चौघेजण अंधारामध्ये लपून बसले असून ते बेलदरे पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असल्याची खबर भारती विद्यापीठ पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रदीप गुरव, पोलिस कर्मचारी विनोद भंडलकर यांना मिळाली. त्यानुसार, त्यांनी पोलिस निरीक्षक महेंद्र पाटील यांना याबाबत माहिती दिली. त्यानुसार, पोलिस निरीक्षक विष्णू पवार, पोलिस निरीक्षक (गुन्हे) विष्णू ताम्हाणे यांच्या मार्गदर्शनाखाली पाटील यांनी पोलिस कर्मचाऱ्यांची दोन पथके तयार करून दत्तनगरला पाठविली. पोलिसांच्या पथकाने परिसराची पाहणी केली, त्यावेळी चार ते पाच तरुण अंधारामध्ये संशयास्पदरीत्या फिरत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. त्यानुसार पोलिसांनी त्यांना सापळा रचून अटक केली. 

कुडले, वाडकर व साळवी हे तिघेही सराईत गुन्हेगार आहेत. तर कुडले व वाडकर या दोघांवर यापूर्वीही दरोड्याचा, तर साळवीवर गंभीर दुखापत करण्याचा गुन्हा दाखल आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून दोन लोखंडी कोयते, मिरची पूड, दोन दुचाकी व मोबाईल असा सव्वा लाख रुपयांचा ऐवज जप्त केला. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com