Pune Police : पुणे पोलिसांना फिक्कीतर्फे स्मार्ट पोलिसिंग पुरस्कार प्रदान

पुणे शहर पोलिसांना फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज (फिक्की)च्या वतीने स्मार्ट पोलिसिंगचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
Pune Police awarded Smart Policing Award by FICCI
Pune Police awarded Smart Policing Award by FICCIsakal

पुणे : पुणे शहर पोलिसांना फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज (फिक्की)च्या वतीने स्मार्ट पोलिसिंगचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. नवी दिल्ली येथील फिक्की हाऊस येथे आयोजित समारंभात पोलिस आयुक्त रितेश कुमार यांच्या नेतृत्वाखाली पुणे पोलिसांना ‘सर्व्हिस एक्सलन्स अँड व्हिक्टिम असिस्टन्स’सेवा या उपक्रमासाठी ‘फिक्की स्मार्ट पोलिसिंग’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

हा पुरस्कार पुणे पोलिसांनी उत्कृष्ट सेवा पुरवण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचा गौरव आहे. यासाठी काम करणाऱ्या सर्व युनिट्सचे पोलिस आयुक्त रितेश कुमार आणि पोलिस सहआयुक्त संदीप कर्णिक यांनी अभिनंदन केले आहे.

पोलिस आयुक्तालय, पुणे : नवी दिल्ली येथील फिक्की हाऊस येथे पुणे पोलिसांना ‘फिक्की स्मार्ट पोलिसिंग’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यानिमित्त पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी पुरस्कार प्राप्त करण्यात योगदान देणाऱ्या सहकाऱ्यांचा गौरव केला.

या वेळी (डावीकडून) अतिरिक्त पोलिस आयुक्त प्रवीणकुमार पाटील, पोलिस उपायुक्त सुहेल शर्मा, पोलिस आयुक्त रितेश कुमार, पोलिस सहआयुक्त संदीप कर्णिक, अतिरिक्त आयुक्त रामनाथ पोकळे आणि पोलिस उपायुक्त संदीपसिंग गिल.

Related Stories

No stories found.
Sakal
www.esakal.com