पुण्यातही गुडविन ज्वेलर्सच्या संचालकांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा; कोण आहेत गुंतवणूकदार?

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 5 नोव्हेंबर 2019

मुंबई, ठाणे व पालघर येथील शेकडो ग्राहकांची फसवणूक करणाऱ्या गुडविन ज्वेलर्सच्या फसवणूकीचे लोण पुण्यात येऊन पोचले आहे. ठेवींमध्ये गुंतवणूक केल्यास जादा परतावा किंवा सोन्याचे दागिने देण्याच्या बहाण्याने गुडविन ज्वेलर्सने शहरातील 89 जणांची तीन कोटी चार लाख रुपयांची आर्थिक फसवणुक केली. याप्रकरणी फसवणूक झालेल्यांनी गुडवीन ज्वेलर्सचा मालक व व्यवस्थापकीय संचालकासह सहा जणांविरुद्ध कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात गुन्हा केला.

पुणे - मुंबई, ठाणे व पालघर येथील शेकडो ग्राहकांची फसवणूक करणाऱ्या गुडविन ज्वेलर्सच्या फसवणूकीचे लोण पुण्यात येऊन पोचले आहे. ठेवींमध्ये गुंतवणूक केल्यास जादा परतावा किंवा सोन्याचे दागिने देण्याच्या बहाण्याने गुडविन ज्वेलर्सने शहरातील 89 जणांची तीन कोटी चार लाख रुपयांची आर्थिक फसवणुक केली. याप्रकरणी फसवणूक झालेल्यांनी गुडवीन ज्वेलर्सचा मालक व व्यवस्थापकीय संचालकासह सहा जणांविरुद्ध कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात गुन्हा केला. 

गुडवीन ज्वेलर्सचा मालक व व्यवस्थापकीय संचालक सुनीलकुमार अकाकरण मोहनन, संचालक सुधीर अकाकरण, शाखा व्यवस्थापक जस्टीन, सेल्समन अश्‍विन, चंद्रिका, श्रीकला नायर अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी आशा गणेश गायकवाड (वय 45, रा. महाराष्ट्र हौसिंग बोर्ड, येरवडा) यांनी फिर्याद दाखल केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या गृहीणी आहेत. त्यांनी बंडगार्डन रस्त्यावरील कॅनोट प्लेस येथील गुडविन ज्वेलर्स येथे 2018 पासून गुडविन ज्वेलर्सचा मालक व व्यवस्थापकीय संचालक सुनीलकुमार अकाकरण मोहनन, संचालक सुधीर अकाकरण, ाखा व्यवस्थापक जस्टीन, सेल्समन अश्‍विन, चंद्रिका, श्रीकला नायर यांच्यासह अन्य व्यक्तींनी संबंधीत सराफी दुकानामधील भिशी व गुंतवणुक योजनेनुसार, पैसे गुंतविल्यास अधिक नफा मिळेल किंवा सोन्याचे दागिने देण्याचे आमिष दाखविले. त्यानुसार फिर्यादी यांचा विश्‍वास संपादन करुन तीन लाख रुपयांची गुंतवणूक करण्यास भाग पाडले. त्यानंतर त्यांनी फिर्यादी यांना कोणत्याही प्रकारचा जादा परतावा किंवा सोन्याचे दागिने न देता त्यांची फसवणुक केली. फिर्यादी यांच्याप्रमाणेच शहरातील 88 जणांची तब्बल तीन कोटी 4 लाख 43 हजार 880 रुपये इतक्‍या रकमेची फसवणूक केली. गुडवीन ज्वेलर्सने इतक्‍या रकमेचा अपहार केल्याप्रकरणी त्यांच्याविरुद्ध आर्थिक फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा तपास पोलिस उपनिरीक्षक बी.जी.शेंडगे करीत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pune police booked charges against goodwin owners and directors