Ajit pawar : ...तर मला सुद्धा टायरमध्ये घाला; अवैध व्यवसायाबद्दल अजित पवार संतापले

पवार साहेब, सुप्रिया आणि मी स्वतः बारामती पाहूणेवाडी परिसरातल्या दारू भट्ट्या बंद करतो आणि शासनाचा पगार मात्र पोलीस घेतील, एवढेच आता आमच्याकडून राहिले आहे,
अजित पवार
अजित पवारesakal

बारामती - पाहुणेवाडी परिसरातील अवैद्य व्यवसायाबद्दल विरोधी पक्षनेते अजित पवार कमालीचे आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. पवार साहेब, सुप्रिया आणि मी स्वतः बारामती पाहूणेवाडी परिसरातल्या दारू भट्ट्या बंद करतो आणि शासनाचा पगार मात्र पोलीस घेतील, एवढेच आता आमच्याकडून राहिले आहे,

अजित पवार
Pune : मुठभर लोकांच्या हातात संपत्ती म्हणजे नवा भारत नव्हे - हुसेन दलवाई

असा उपरोक्तिक टोला अजित पवार यांनी मारीत माळेगाव पाहुणेवाडी परिसरातली अवैद्य दारू धंद्या संदर्भात पोलिसांना धारेवर धरले. पोलीस अधिकाऱ्यांना सूचना देताना ते म्हणाले कारवाई इतकी आक्रमक करा की उद्या अजित पवारांची भट्टी असली तरी मला सुद्धा टायरमध्ये घाला, परंतु एकही दारू धंदेवाल्याला सोडू नका इतक्या आक्रमक भाषेत पवार यांनी पोलीस यंत्रणेला बजावले.

अजित पवार
Mumbai : डोंबिवली जिमखान्याचा खासगीकरणाचा घाट; कार्यकारिणीवर सदस्यांचा आरोप

पुढच्या कार्यक्रमाला या परिसरात आलो तर लोकांनी मला तुमच्या पोलीस कामगिरीच्या बद्दल सांगणं हवा आहे अशी अपेक्षा यावेळी पवार यांनी केली. पाहुणेवाडी येथे राष्ट्रवादी जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटन निमित्ताने अजित पवार यांची जाहीर सभा पार पडली, सरपंच भगवानराव तावरे या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी होते.

अजित पवार
Mumbai News : लग्नसराई, त्यात उन्हाळी सुट्टी! मेगाब्लॉकमुळे मुंबईकर बेहाल

दरम्यान, जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी झालेल्या सभेत अवैद्य व्यवसायाच्या संदर्भात आलेले निवेदन चक्क अजित पवार यांनी उपस्थितांपुढे वाचून दाखवले. निवेदनामध्ये परिसरात दारू भट्ट्यांचे वाढते प्रमाण लोकांच्या आरोग्याच्या दृष्टीने आणि सार्वजनिक शांततेच्या दृष्टीने घातक ठरत चाललेले आहे. महिला आणि मुलींच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने गावामध्ये पूर्णता अवैद्य दारू बंद झाली पाहिजे अशी आग्रही मागणी यावेळी करण्यात आली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com