Pune-Police
Pune-Police

पुणे पोलिसांनी घडविले माणुसकीचे दर्शन; 'लॉकडाऊन'मध्ये करताहेत अन्नधान्याच्या पाकिटांचे वाटप!

पुणे : शहरात कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत असताना शहरातील गरीब, गरजू, बेघर, कामगार, देहविक्रय करणाऱ्या महिला अशा विविध घटकातील लोकांना पुणे पोलिसांनी तब्बल तीन लाख ९३ हजार ३५४ अन्नाची पाकिटे व अन्नधान्य देत त्यांचे जगणे सुकर केले. त्यासाठी पोलिस आयुक्त डॉ. के. वेंकटेशम यांनी खास 'सोशल पोलिसिंग सेल' हा पोलिसांचा स्वतंत्र आपत्कालीन विभाग सुरु करुन त्याद्वारे लोकांना आधार देण्यास प्राधान्य दिले.

शहरामध्ये कोरोना विषाणूचा संसर्ग व प्रादुर्भाव वाढत असताना त्यावर नियंत्रण  मिळविण्यासाठी केंद्र व राज्य सरकारच्या आदेशानुसार, पोलिसांनी २२ मार्चपासून शहरात प्रारंभी जमावबंदी व नंतर संचारबंदी लागू केली. संचारबंदी आदेशामुळे गरीब, गरजू, कामगार, मजूर, देहविक्रय करणाऱ्या महिला, तृतीयपंथी, विद्यार्थी, रुग्ण व त्यांचे नातेवाईक यांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होऊ लागली होती. याबरोबरच नाकाबंदी असल्याने नागरिकांना अन्य ठिकाणी किंवा बाहेरगावी जाणेही शक्य झाले नाही. त्यामुळे हजारो नागरिक ठिकठिकाणी अडकून पडले.

या सगळ्या परिस्थितीची पोलिस आयुक्त डॉ..के.वेंकटेशम यांनी गांभीर्याने दखल घेतली. त्यानंतर अडचणीत सापडलेल्या नागरिकांना स्थानिक पोलीस ठाणे, वाहतूक विभाग यांच्यामार्फत विविध घटकांना अन्नाची पाकिटे, अन्नधान्य देऊन त्यांना दिलासा देण्यासाठी सांगितले. त्यानुसार, शहरातील ३० पोलिस ठाण्याच्या माध्यमातून मदत देऊ इच्छिणाऱ्या व्यक्ती, संस्था यांच्याकडून तयार अन्नाची पाकिटे, अन्नधान्याची पाकिटे, सैनीटायजर , मास्क, साबण, पाण्याच्या बाटल्या अशी मदत गोळा करून ती गरीब, गरजू, कामगार, मजूर, देहविक्रय करणाऱ्या महिला, तृतीयपंथी, विद्यार्थी यांना देण्यात आली. विशेषत: विविध रुग्णालयात दाखल असणारे रुग्ण व त्यांचे नातेवाईक यांना देखील ही मदत देण्यात आली.

दरम्यान, पोलिसांकडून होणाऱ्या या सर्व कामाची एकत्रीत नोंद ठेवली जावी, यासाठी पोलिस आयुक्त डॉ.के.वेंकटेशम यांनी 'सोशल पोलिसिंग सेल'ची स्थापना केली. २५ मार्च ते ११ एप्रिल या कालावधीत चार लाख लोकांना अन्नाची पाकिटे व अन्नधान्याची पाकिटे पोलिस ठाणे व वाहतूक शाखा यांच्या माध्यमातून देण्यात आले. तर सोशल पोलिसिंग सेलची स्थापना झाल्यानंतर ७ एप्रिलपासून विविध सामाजिक संस्थाचा माध्यमातून ७ एप्रिलला ३९ हजार ४०७, ८ एप्रिल रोजी २६ हजार ७८०, अन्न पाकिटे वाटप करण्यात आली. तर ९ एप्रिलला ४० हजार ४६३, १० एप्रिल रोजी ३७ हजार ३९२ व ११ तारखेला ३७ हजार ३१२ इतक्या नागरिकांना अन्न देऊन दिलासा देण्यात आला. २५ मार्च ते ११ एप्रिल या कालवधित तीन लाख ९३ हजार ३५४ इतक्या नागरिकांना मदत करण्यात आली.

'सोशल पोलिसिंग सेल' कायम राहणार सक्रिय

पुणे पोलिसांनी आपत्कालीन परिस्थितीमध्ये नागरिकांना दिलासा देण्यासाठी 'सोशल पोलिसिंग सेल' सुरू केला आहे. त्यामुळे केवळ कोरोना पुरतेच हे काम मर्यादित न ठेवता ते यापुढे देखील सुरू ठेवण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे. ज्या गरजूंना मदत हवी आहे आणि ज्यांना मदत करण्याची इच्छा आहे, अशा दानशूर व्यक्ती, सामाजिक संस्था यांनी दररोज सकाळी १० ते दुपारी ४ या वेळेत ८८०६८०६३०८ या क्रमांकावर फोन किंवा व्हॉटसअप मेसेज करावा, असे आवाहन गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलिस आयुक्त विजय चौधरी यांनी केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com