हरवलेल्या 'शेरू'ला पुणे पोलिसांनी काढले शोधून 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 16 मे 2019

पुणे : लहान मुलं, वृद्ध व्यक्ती हरवल्याच्या, रस्ता भरकटल्याच्या अनेक घटनांमध्ये पोलिस गतीने तपास करून त्यांना शोधून काढत असतात. मात्र, आता पोलिसांना पाळीव प्राणीही शोधायची वेळ आली आहे. कासेवाडी येथे हरवलेला कुत्रा शोधून काढण्याची कामगिरी खडक पोलिसांनी केली. 

सुखिया मेघराज चौधरी (वय 42, रा. कासेवाडी) यांच्या घरातील पाळीव कुत्रा 'शेरू' हरवल्याची तक्रार त्यांनी कासेवाडी पोलिस चौकीमध्ये केली. प्रिया असलेला शेरू हरवल्याने चौधरी या व्यथीत झालेल्या होत्या. त्यांची स्थिती पाहून पोलिस चौकीतील पोलिस कर्मचारी माळी, गायकवाड, पाटेकर यांनी त्वरीत 'शेरू'चा शोध घेण्यास सुरूवात केली.

रामोशी गेट पोलिस चौकी, कासेवाडी, भवानी पेठ भागात त्यांनी चौकशी सुरू केली. त्यावेळी त्यांनी भवानी पेठेतील मशिदीजवळ एका कुत्र्यावर अनेक कुत्रे भूंकत असल्याचे पोलिसांना दिसले. त्यांनी त्वरीत चौधरी सुखिया यांना तेथे बोलावून घेतले. हा कुत्रा 'शेरू'चे असल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार त्यांना पुन्हा चौकीत बोलावून 'शेरू'ला चौधरी यांच्या स्वाधीन केले, अशी माहिती खडक पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षत राजेंद्र मोकाशी दिली. 

Web Title: The Pune police find out lost dog

टॅग्स