पुणे पोलिस म्हणतात, तिळगुळ घ्या; गोड बोला अन्, कडू बोलणाऱ्यांना...

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 15 जानेवारी 2020

पुणे पोलिस सोशल मिडियावर अॅक्टीव्ह आहेत. पुणेकर आणि पुणे पोलिस यांच्यामधील गमतीशीर संवाद सोशल मिडियावर चांगलाच चर्चेत आहे. ट्विटरवर पुणे पोलिस पुणेरी शैलीतच पुणेकरांना उत्तर देतात. पुणे पोलिसांच्या उत्तराला नेटकऱ्यांची दाद मिळत आहे

पुणे : पुणेकरांची पुणेरी शैली जगभर प्रसिध्द आहे. मग, या पुणेरी शैलीपासून पुणे पोलिस तरी कसे दुर राहतील. आज पुणे पोलिसांनी पुणेरी शैलीतच पुणेकरांना मकर संक्रातीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

तरुणाने मागितला मुलीचा नंबर अन् पुणे पोलिसांनी दिले 'हे' उत्तर
 

पुणे पोलिस सोशल मिडियावर अॅक्टीव्ह आहेत. पुणेकर आणि पुणे पोलिस यांच्यामधील गमतीशीर संवाद सोशल मिडियावर चांगलाच चर्चेत आहे. ट्विटरवर पुणे पोलिस पुणेरी शैलीतच पुणेकरांना उत्तर देतात. पुणे पोलिसांच्या उत्तराला नेटकऱ्यांची दाद मिळत आहे. 

पुणे पोलिसच होतायेत ट्विटरवर ट्रेंड; वाचा काय घडले?

आज मकारसंक्रातीनिमित्त पुणे पोलिसांनी अशाच पुणेरी शैलीत पुणेकरांना शुभेच्छा दिल्या आहे. पुण्याचे पोलिस आयुक्त के. व्यंकटेशम यांनी पुणेरी शैलीत ट्विट करुन पुणेकरांना मकरसंक्रातीच्या शुभेच्छा दिल्या आहेत '' #तीळगुळ घ्या, गोड़ बोला, आणि कडू बोलणाऱ्या/ वागणाऱ्या लोकांची माहिती आम्हाला द्या. 8975283100 किंवा 100 असे ट्विटकरुन पुणेकरांना सजग राहण्याचे आवाहन केले आहे. 

पुणे : पोलिसांनी वाचला वृद्धाश्रमाचा बोर्ड अन्..


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pune Police gave wishes Of Makarsankrat to Pune Citizen