कसबा गणपतीसमोर तरुणांच्या उठाबशा, वाचा नक्की काय घडलं?

कसबा गणपतीसमोर तरुणांनी काढल्या उठाबशा
कसबा गणपतीसमोर तरुणांच्या उठाबशा, वाचा नक्की काय घडलं?

पुणे : पुण्यात गणपती पाहायला बाहेर पडत असाल तर सावधान! रात्री 10 नंतर संचारबंदी कायम असून नागरिक त्याच पालन करताना दिसत नाही. कसबा गणपतीसमोर असेच विनाकारण बाहेर पडलेल्या तरुणांना उठाबशा मारायची शिक्षा पुणे पोलिसांनी दिली आहे.

कसबा गणपतीसमोर तरुणांच्या उठाबशा, वाचा नक्की काय घडलं?
राज्यपालांना कोरोनाचा विसर?, सत्कारावेळी स्पर्धकाचा स्वत: काढला मास्क

पुण्यात गणपती पाहायला बाहेर पडत असाल, पुणे पोलिसांचे तुमच्यावर लक्ष आहे हे विसरू नका. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यात सध्या रात्री 10 नंतर संचारबंदी कायम आहे पण, नागरिक मात्र या नियमांचे पालन करताना दिसत नाही. पुणे पोलिस आणि महापालिका प्रशासनाने वारंवार सांगूनही मानाचे गणपतींच्या दर्शनासाठी नागरिक पेठेत गर्दी करत आहेत.

कसबा गणपतीसमोर तरुणांच्या उठाबशा, वाचा नक्की काय घडलं?
फडणवीस, शेलार यांच्या वकिलीच्या पदव्या बोगस आहेत का?

कोरोना संसर्गाची भिती न बाळगता नागरिक सर्सास नियामांचे उल्लंघन करत आहे. पण, पुणे पोलिस अशा नागरिकांवर आता कार्यवाही न करता सरळ उठाबशा काढण्याची शिक्षा देत आहे. त्यामुळे तुम्हीही शहरात नियमांचं पालन न करता व विनाकारण रस्त्यावर फिरत असाल तर उठाबशा काढण्यासाठी तयार राहा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com