Sun, Sept 24, 2023

Police Havaldar : सेवानिवृत्तीच्या दुसऱ्याच दिवशी पोलिस हवालदाराचा मृत्यू
Published on : 1 June 2023, 5:29 pm
पुणे - शहर पोलिस दलातून सेवानिवृत्त झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी एका पोलिस हवालदाराचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी घडली. प्रकाश अनंता यादव असे मृत पोलिस हवालदाराचे नाव आहे.
प्रकाश यादव हे बुधवारी (ता. ३१) शहर पोलिस दलातून सेवानिवृत्त झाले होते. शिवाजीनगर येक्षील पोलिस मुख्यालयात आयोजित कार्यक्रमात अतिरिक्त पोलिस आयुक्त प्रवीण कुमार पाटील आणि पोलिस उपायुक्त संदीपसिंह गिल यांच्या हस्ते यादव यांचा सत्कार करण्यात आला होता.

सेवानिवृत्तीच्या दुसऱ्या दिवशी यादव यांचा मृत्यू झाल्यामुळे पोलिस दलात हळहळ व्यक्त होत आहे. प्रकाश यादव हे पोलिस मुख्यालयात ‘सी’ कंपनीत कार्यरत होते. ते पोलिस जिम ट्रेनर होते. त्यांचा स्वभाव अत्यंत मनमिळावू होता. त्यांच्या निधनाने कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे.