मास्क न वापरणाऱ्यांवर पुण्यात पोलिसांकडून दंडात्मक कारवाईला सुरुवात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Crime on without mask people
मास्क न वापरणाऱ्यांवर पुण्यात पोलिसांकडून दंडात्मक कारवाईला सुरुवात

मास्क न वापरणाऱ्यांवर पुण्यात पोलिसांकडून दंडात्मक कारवाईला सुरुवात

पुणे - शहरामध्ये कोरोना संसर्ग (Corona Infection) दिवसेंदिवस वाढत असल्याने पोलिसांनीही (Police) आता मास्क (Mask) न घालणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईचा (Crime) बडगा उगारण्यास सुरुवात केली आहे. मास्क परिधान न करणाऱ्या सुमारे दिड हजार जणांवर पोलिसांनी दंडात्मक कारवाई सुरु केली आहे.

मागील काही दिवसातच कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे. तरीही नागरीकांकडून सार्वजनिक ठिकाणी, खासगी, सरकारी कार्यालये, बाजारपेठांमध्ये मास्कचा वापर होत नसल्याची सद्यस्थिती आहे. नागरीकांमध्ये अजूनही कोरोनाबाबत गांभीर्य नसल्यामुळे पोलिस सहआयुक्त डॉ.रविंद्र शिसवे यांनी बुधवारपासून शहरात मास्क परिधान न करणाऱ्या नागरीकांवर दंडात्मक कारवाई करणार असल्याचे स्पष्ट केले होते. त्यानुसार, बुधवारपासून शहरात मास्कची कारवाई सुरू करण्यात आली. तर बुधवारी सकाळपासूनच शहरातील प्रमुख रस्ते, मुख्य चौक, बाजारपेठा अशा गर्दीच्या ठिकाणी पोलिसांकडून मास्क न घालणाऱ्यांवर कारवाई करण्यात येऊ लागल्याचे चित्र दिसून आले.

हेही वाचा: Mhada Home : म्हाडाच्या ४ हजार २२२ सदनिकांसाठी सोडत शुक्रवारी

बुधवारी दिवसभरात शहरात मास्क परिधान न करणाऱ्या 391 जणांवर पोलिसांनी दंडात्मक कारवाई केली होती. तर दुसऱ्या दिवशी गुरुवारी मास्कचा वापर न करणाऱ्या अकराशेहून अधिक नागरीक पोलिसांना आढळून आले. त्यानुसार, पोलिसांनी त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करुन प्रत्येकी 500 रुपयांचा दंड आकारला. पोलिस कारवाई करीत असल्याचे पाहून भितीपोटी नागरीकांकडून मास्क घातले जात होते. तर काहीजण कारवाई टाळण्यासाठी वेगळ्या वाटेने पळून जाण्याचा प्रयत्न केल्याचे चित्र शहरात दिसून आले.

'शहरात कोरोनाचा संसर्ग वाढला तरीही नागरीक मास्क वापरत नाहीत. त्यामुळे संसर्गामध्ये आणखी वाढ होईल. हे टाळण्यासाठी नागरीकांना मास्क घालण्याबाबत वारंवार आवाहन केले. आता दंडात्मक कारवाई सुरु केली आहे. नागरीकांनी खबरदारी बाळगण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर करावा. तसेच मास्कचा वापर, सोशल डिस्टंसींग, हात स्वच्छ धुणे हि त्रिसुत्री दैनंदिन जीवन जगताना आवश्‍यक अंगीकारावी.'

- डॉ.रविंद्र शिसवे, पोलिस सहआयुक्त

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top