पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात पोलिस तपास कासवगतीने

Pune Police f Pooja  chavan suicide case
Pune Police f Pooja chavan suicide case

पुणे : पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात वानवडी पोलिसांचा तपास अकस्मात मृत्यू व जबाब नोंदणी, अहवाल पाठविणे आणि जळगाव येथील भेट यापलीकडे पोचला नाही. घटना घडून १८ ते २० दिवस उलटल्यानंतरही याबाबत पोलिस अजूनही ठोस तपास करत नसल्याची सद्यःस्थिती आहे.

पूजा चव्हाण हिने ७ फेब्रुवारीला मध्यरात्री वानवडी येथील हेवन पार्क या इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केली होती. या प्रकरणी वनमंत्री संजय राठोड यांचे नाव पुढे आले. त्यानंतर भाजपने सरकारवर टीकेची झोड उठवत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. दरम्यान, राष्ट्रीय महिला आयोगाने महाराष्ट्र पोलिस दलाचे महासंचालक हेमंत नगराळे यांना पत्र पाठवले. त्यानंतर पुणे पोलिसांनी महिला आयोग व पोलिस महासंचालकांना तपास अहवाल दिला. त्याचबरोबर पोलिसांनी तिचे वडील, भाऊ यांचे जबाब घेतले. तसेच जळगाव येथे जाऊन तपास केला. दरम्यान, भाजपच्या महिला उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी घटनास्थळी भेट देऊन, पुणे पोलिसांवर टीका केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com