Pune : मार्केट यार्डात चोरी करताना 'तो' सी सी टीव्हीत दिसला अन्.. पुढे काय झालं ?

मार्केट यार्डात दररोज शेतमालाच्या चोर्‍या होतच असून चोर त्यापुढे जाऊन आता अक्षरश: दुकानांचे शटर तोडून चोर्‍या करू लागले आहेत. बाजारात सीसीटिव्ही कॅमेर्‍यांच्या तोडफोडीच्या घटना वारंवार घडत आहेत.
pune
puneesakal

मार्केट यार्ड - पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्डातील फळे-भाजीपाला, गुळ भुसार बाजारात चोर्‍यांचे प्रमाण वाढले आहे. बाजारात सातत्याने चोऱ्या होत आहेत. ठरवून दिलेल्या संख्येत सुरक्षा रक्षक उपस्थित नसल्याने चोरांचे चांगलेच फावते आहे. नवनियुक्त संचालक मंडळ ही याकडे दुर्लक्ष करत असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.

मार्केट यार्डात दररोज शेतमालाच्या चोर्‍या होतच असून चोर त्यापुढे जाऊन आता अक्षरश: दुकानांचे शटर तोडून चोर्‍या करू लागले आहेत. बाजारात सीसीटिव्ही कॅमेर्‍यांच्या तोडफोडीच्या घटना वारंवार घडत आहेत. काही दिवसांपूर्वी गुळ भुसार बाजारात नेहरू रस्त्यावरील दोन दुकाने फोडली होती.

pune
Pune : कुकडीच्या पाण्यासाठी उद्या जुन्नर येथे सर्वपक्षीय आंदोलन - आमदार अतुल बेनके

त्यापैकी एका दुकानातुन सुमारे ३० हजार रूपयांची तर, भगवती ट्रेडर्स या दुकानातून सुमारे तीन लाखांची चोरी झाली होती. मागील आठवड्यात ज्योती पान शॉप फोडून रोख रक्कमसह सुमारे वीस हजारांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला. याबाबत संबंधितांनी पोलीसांत तक्रारी दिल्या असल्यातरी त्यावर पुढे काहीही कारवाई होत नसल्याचे संबंधितांचे म्हणणे आहे. दुसरीकडे फळे भाजीपाला बाजारात गाळ्यांवरून भाजीपाल्यासह आंबा, सफरचंदाच्या पेट्यांच्या पेट्या लंपास केल्या जात आहेत.

बाजारात दररोज वाहतूक कोंडी

सकाळच्या टप्प्यात बाजारात वाहतुक कोंडी होत आहे. याचा फटका शेतकरी, अडत्यांना बसत आहे. दररोज शेतमालाच्या चोर्‍या आणि वाहतुककोंडी होत असताना सुरक्षा रक्षक जागेवर नसल्याचे समोर आले आहे. मेस्को कर्मचार्‍यांकडे हजेरी असल्याने हजेरीपुरते सर्व सुरक्षा रक्षक वेळेवर येऊन सही करून पुन्हा गायब होतात. काम न कराताही बाजार समिती पगार देत असल्याची चर्चा आहे. त्यामुळे मार्केट यार्डातील सुरक्षा व्यवस्था कधी सुधारणा असा प्रश्न बाजार घटकांना पडला आहे.

pune
Mumbai Crime : 'आयटी'मधील महिलेचा सार्वजनिक शौचालयात व्हीडिओ केला; नवी मुंबईतल्या घटनेने खळबळ

संचालक मंडळ बाजाराच्या सुरक्षेकडे लक्ष देणार का?

कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणुक काही दिवसांपूर्वी पार पडली आहे. यामध्ये सभापती, उपसभापती निवडी देखील झाल्या आहेत. आता नवनियुक्त संचालक मंडळ बाजारात होणाऱ्या चोऱ्या आणि वाहतूकोंडी रोखण्यासाठी उपाययोजना करणार का? असा प्रश्न एका ज्येष्ठ व्यापाऱ्याने उपस्थित केला आहे.

सुरक्षेसाठी मोठा खर्च करूनही बाजाराची सुरक्षा उपयोगाची आहे का असा प्रश्न पडतो आहे. बाजारात चोर्‍या वाढल्या असून चोर्‍या करणार्‍यांचे चेहरे सीसीटीव्ही कॅमेरेत स्पष्ट दिसतात. परंतु चोरांच्या दहशतीमुळे कोणही कारवाई करत नाही. चोरी केलेला शेतमाल गेटच्या बाहेर नेताना सुरक्षा रक्षक त्यांना हटकत नाहीत. सध्या एका आंब्याची पेटी चार ते पाच हजार रूपयांची आहे. यामध्ये शेतकरी आणि अडत्यांचे नुकसान होत आहे.

- युवराज काची, माजी उपाध्यक्ष, अडते असोसिएशन.

सुरक्षा व्यवस्थेमध्ये आवश्यक त्या सुधारणा लवकरच केल्या जातील. बाजारातील चोर्‍यांच्या घटनांच्या पार्श्वभुमीवर रात्रीची गस्तीसाठी फिरते वाहन ठेवण्यात आले आहे.

- डॉ.राजाराम धोंडकर, सचिव, कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com