Video:पुण्यात गर्दीमुळं शिवभोजन थाळीला पोलिस संरक्षण  

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 28 जानेवारी 2020

पुणे शहरात सध्या 11 ठिकाणी शिवभोजन केंद्र सुरू करण्यात आले आहे. त्यातील मंडई परिसरातील एक केंद्र बंद आहे. सुरू करण्यात आलेल्या 10 केंद्रांपैकी मार्केट यार्ड येथील केंद्रावर सर्वाधिक गर्दी आहे

पुणे : पुण्यात शिवभोजन केंद्रावर उसळलेल्या तुफान गर्दीमुळे काल पोलिस संरक्षणाची मागणी करण्यात आली होती. आज, या केंद्राला पोलिस संरक्षण मिळाले असून, बंदोबस्त शिवभोजन थाळीचे वितरण सुरू करण्यात आले आहे. शिवभोजन केंद्राला पोलिस संरक्षण देण्यात आल्याची ही राज्यातील पहिली वेळ आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

Image may contain: 7 people, including Prashant Salunkhe, people standing and outdoor

पुण्यात 11 पैकी 10 केंद्रे सुरू
पुणे शहरात सध्या 11 ठिकाणी शिवभोजन केंद्र सुरू करण्यात आले आहे. त्यातील मंडई परिसरातील एक केंद्र बंद आहे. सुरू करण्यात आलेल्या 10 केंद्रांपैकी मार्केट यार्ड येथील केंद्रावर सर्वाधिक गर्दी आहे. केंद्रवरील गर्दीवर नियंत्रण मिळवण्यात अपयश येत असल्यामुळं पोलिस संरक्षणाची मागणी करण्यात आली होती. त्यानुसार आज, पोलिस बंदोबस्त देण्यात आला असून, दोन पोलिसांच्या बंदोबस्तात शिवभोजन केंद्र सुरू आहे. मार्केट यार्डातील शिवभोजन केंद्रावर नागरिकांची गर्दी झाली होती. दुसऱ्या दिवशी म्हणजेच सोमवारी तासाभरातच दीडशे थाळ्या संपल्या होत्या. केंद्रावरची गर्दी थांबत नसल्यामुळं अन्नधान्य वितरण विभागाच्या अधिकाऱ्यांनी पोलिस बंदोबस्ताची मागणी केली होती. आज, पोलिस दाखल झाल्यामुळं गर्दीही नियंत्रणात होती. 

पुण्याच्या आणखी बातम्या वाचा येथे ►क्लिक करा

Image may contain: 7 people

चांगला प्रतिसाद
पुण्यात दहा केंद्रांवर पहिल्या दिवशी रविवारी (ता. 26) एक हजार 114 नागरिकांनी; तर दुसऱ्या दिवशी सोमवारी एक हजार 305 शिवभोजन थाळींचा आस्वाद घेतला होता. दरम्यान, दहा पैकी तीन केंद्रांवर नागरिकांचा अत्यल्प प्रतिसाद आहे. त्यात पीएमआरडीए आकुर्डी रेल्वे स्थानक, वल्लभनगर बस स्थानक, पिंपरी-चिंचवड महापालिकेतील भोजनालयात नागरिकांचा कमी प्रतिसाद मिळाला, असे अन्नधान्य वितरण अधिकारी अस्मिता मोरे यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pune police protection at shiv bhojan kendra market yard