अबब! एका मोबाईल चोरीच्या तपासात पोलिसांना सापडले 40 मोबाईल

police
police

पुणे : चोरीस गेलेल्या एका मोबाईलचा तपास करताना खडक पोलिसांना चोरट्यांकडून चक्‍क 40 मोबाईल सापडले. दोन सराईत चोरट्यांकडून खडक पोलिसांनी 40 मोबाईल जप्त केले असून, त्यांची किंमत सुमारे साडेतीन लाख रुपये इतकी आहे.

या प्रकरणी पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. गणेश बाळासाहेब साठे (वय 22, मूळ रा. सांगली) आणि काशीराम देवला चव्हाण (वय 34, रा.शिंदेआळी, शुक्रवार पेठ) अशी त्या संशयितांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सदाशिव पेठेत खजिना विहिरीजवळ राहणाऱ्या शुभम राजेश देशमुख हा विद्यार्थी घराचा दरवाजा अर्धवट उघडा ठेवून नाष्टा करण्यासाठी बाहेर गेला होता. चोरट्याने ही संधी साधत त्याचा ऍपल कंपनीचा मोबाईल चोरी केला होता. या प्रकरणी त्याने खडक पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. या गुन्ह्याचा तपास करताना खडक पोलिसांना दोन सराईत चोरट्यांनी मोबाईल चोरल्याची माहिती मिळाली. त्यावरून तपास करताना साठे याच्याकडे तो मोबाईल सापडला. तर, चव्हाण याच्या घराची झडती घेतली असता पोलिसांना बॅगमध्ये विविध कंपन्यांचे 39 मोबाईल आढळून आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com