esakal | पुण्याबाहेर जाण्यासाठी बनावट इ-पास बनविणाऱ्यास अटक

बोलून बातमी शोधा

arrest
पुण्याबाहेर जाण्यासाठी बनावट इ-पास बनविणाऱ्यास अटक
sakal_logo
By
पांडुरंग सरोदे@spandurangSakal

पुणे : नागरिकांना जिल्ह्याबाहेर व परराज्यात जाण्यासाठी बनावट ई-पास तयार करून देत शासनाची फसवणूक करणाऱ्या एकास पुणे पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा व दरोडा विरोधी पथकाने अटक केली. धनाजी मुरलीधर गंगनमले (वय 29, रा. भेकराईनगर, फुरसुंगी ) असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोनाचा संसर्गा शहरामध्ये मोठ्या प्रमाणात वाढला असल्याने राज्या सरकारने कडक निर्बंध लादले असून प्रवासासाठीही मर्यादा घातल्या आहेत. नागरीकांना अडचणीच्या काळात अन्य जिल्ह्यात व परराज्यात जाणे शक्‍य व्हावे, यासाठी तसेच अत्यावश्‍यक सेवेसह महत्वाच्या कामांसाठी प्रवास करताना अडथळा निर्माण होऊ नये, यासाठी राज्य सरकारने शासनाने डिजिटल पास बंधनकारक बंधनकारक केले आहेत. परराज्यासह दुसऱ्या जिल्ह्यात जाण्यासाठी पोलिसांच्या वेबसाईटवर अर्ज भरून दिल्यानंतरच नागरीकांना प्रवासासाठी पास प्राप्त होतो.

हेही वाचा: कोरोनानंतरच्या ‘साइड इफेक्टकडे’ द्या विशेष लक्ष!

दरम्यान, अडचणीत सापडलेल्या नागरीकांचा गैरफायदा घेत स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी हडपसर येथे एका तरुणाकडून बनावट ई-पास बनवून तो वितरीत केला जात असल्याची माहिती सामाजिक सुरक्षा विभागाच्या पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी भेकराईनगरमधील विश्वसृष्टी सोसायटीतील तरूणाच्या घरी छापा घातला. त्यावेळी धनाजी गंगनमले हा लॅपटॉपवर बनावट ई-पास बनवून नागरिकांना विक्री करीत असल्याचे आढळून आले. त्याच्याविरूद्ध हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपायुक्त (गुन्हे) श्रीनिवास घाडगे, सहायक पोलीस निरीक्षक जुबेर मुजावर, इरफान पठाण, नीलम शिंदे, पुष्पेंद्र चव्हाण, मॅगी जाधव, गणेश पाटोळे, प्रमोद मोहिते, गणेश ढगे यांच्या पथकाने केली आहे.