Pune : फेरीवाल्यांना सोसायटीत प्रवेश बंद करा; संशयित व्यक्ती दिसल्यास पोलीस स्टेशनला कळवा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

pune

Pune : फेरीवाल्यांना सोसायटीत प्रवेश बंद करा; संशयित व्यक्ती दिसल्यास पोलीस स्टेशनला कळवा

जुन्नर, आळेफाटा - पोलीस स्टेशन हद्दीतील आळेफाटा वडगाव आनंद ,आळेगाव व इतर महत्त्वातील सर्व गावांमध्ये रहिवासी सोसायटी बंगले मालक वस्तीवरील सोसायटी अध्यक्ष उपाध्यक्ष सदस्य यांची आळेफाटा पोलिसांनी सौभद्र मंगल कार्यालय या ठिकाणी बैठक घेण्यात आली या वेळी बैठकीमध्ये वाढलेले चोरांची थांबविण्यासाठी काय उपाय योजना कराव्यात यासाठी मार्गदर्शन करण्यात आले आहे.

खालील प्रमाणे सूचना देऊन मार्गदर्शन करताणा सांगीतले की सोसायटी किंवा रहिवासी बिल्डिंगला संपूर्ण सुरक्षित वॉल कंपाऊंड व त्यावरती काटेरी तारेचा कुंपण करावे, येणाऱ्या जाणाऱ्या गेटवर तसेच सोसायटीच्या संपूर्ण भागावर देखरेख व नियंत्रण ठेवण्यासाठी चांगल्या प्रतीची सीसीटीव्ही यंत्रणा बसवावी, दिवस व रात्रीसाठी सुरक्षा एजन्सी कडून चांगले सुरक्षारक्षक घेऊनच त्यांची नेमणूक सुरक्षारक्षक म्हणून करावी तसेच त्यांचे चारित्र्य पडताळणी पोलीस स्टेशन कडून करून घ्यावी ,

सुरक्षा रक्षक यांनी रहिवासी सोसायटीमध्ये येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना विजिटरला विचारूनच गेटच्या आत मध्ये सोडावे , सोसायटीमध्ये किंवा बंगल्यामध्ये कामाला येणार आहे कामगारांचे नाव पत्ता याची संपूर्ण माहिती सोसायटीचे अध्यक्ष यांनी ठेवावी तसेच त्यांची चारित्र्य पडताळणी करून घ्यावी , इमारतीच्या आजूबाजूला येणार रस्त्यावर व्यवस्थित लाईटची व्यवस्था करावी.

सोसायटीमध्ये फेरीवाले व इतर लोकांना प्रवेश बंद ठेवावा तसेच येणाऱ्या जाणाऱ्या संस्थेत लोकांवर व्यवस्थित सुरक्षारक्षता मार्फत लक्ष ठेवावे काही संशयित व्यक्ती दिसणाऱ्या तात्काळ आळेफाटा पोलीस स्टेशनला संपर्क करावा .तसेच आपल्या घरातील मौल्यवान दागिने रोख रक्कम सुरक्षित ठेवावी असे आवाहन पोलीस निरीक्षक यशवंत नलावडे यांनी केले.

टॅग्स :Pune Newspolicecrime