Pune:'... म्हणून पुण्यातील आंदोलकांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला नाही' | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Pune:'... म्हणून पुण्यातील आंदोलकांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला नाही'

Pune:'... म्हणून पुण्यातील आंदोलकांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला नाही'

राष्ट्रीय तपास एजन्सीने (NIA) पुण्यासह देशभरात पॉप्युलर फ्रन्ट ऑफ इंडिया (PFI) या संघटनेवरील छापेमारीविरोधात पुण्यात आंदोलन केलं होतं. यावेळी 'पाकिस्तान जिंदाबाद' आणि 'अल्लाह हूं अकबर' अशी घोषणाबाजी करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला असल्याचं समोर आलं होतं. जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर पीएफआयच्या कार्यकर्त्यांनी ही घोषणाबाजी केली. याचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला होता.

पुण्यात पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा दिल्याप्रकरणी ज्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला, त्यांच्याबाबत पुणे पोलिसांनी मोठा पाऊल उचललं आहे. गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांवरील देशद्रोहाचे कलम मागे घेण्यात आले आहे. पुणे पोलिसांनी सुप्रीम कोर्टाच्या एका जुन्या निकालाचा दाखला देत या निकालानुसार घोषणाबाजी करणाऱ्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करता येऊ शकत नाही, असं पुणे पोलिसांनी म्हटलं आहे.

हेही वाचा: Video : पुण्यात 'पाकिस्तान जिंदाबाद'च्या घोषणा; जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेरील नारेबाजीनं खळबळ

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिसांना पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देणाऱ्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानंतर पुणे पोलिसांनीही घोषणाबाजी देणाऱ्या संशयितांवर गुन्हा दाखल केला होता. पण अखेर गुन्हा दाखल केलेल्या लोकांवरील देशद्रोहाचं कलम मागे घेण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

पाकिस्तान जिंदाबाद अशी घोषणा देणाऱ्यांची हयगय केली जाणार नाही, त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असं मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी म्हटलं होतं. पोलिसांनी दोषींवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, अशा सूचनाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या होत्या.

टॅग्स :policepune