Sun, Sept 24, 2023

Pune : पोलिस कर्मचाऱ्याची पिंपरीमध्ये आत्महत्या
Published on : 27 May 2023, 4:12 am
पिंपरी - पिंपरी-चिंचवड शहर दलातील पोलिस कर्मचाऱ्यांनी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना शुक्रवारी (ता. २६) पहाटेच्या सुमारास उघडकीस आली.विशाल धनाजी माने (वय ३०, रा. यशवंतनगर, पिंपरी), असे आत्महत्या केलेल्या पोलिस कर्मचाऱ्याचे नाव आहे.
विशाल हे २०१३ मध्ये महाराष्ट्र पोलिस दलात भरती झाले. दरम्यान, विशाल एमआयडीसी भोसरी पोलिस ठाण्यात नेमणुकीस होते. गुरुवारी साप्ताहिक सुटी असल्याने विशाल घरीच होते. रात्री त्यांनी राहत्या घरी गळफास घेतला. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.