पुणे पोलिसांची वेबसाइट अपडेटच्या प्रतिक्षेत 

रवींद्र जगधने 
गुरुवार, 10 मे 2018

पिंपरी : आजच्या इंटरनेटच्या युगात शासनानेही "डिजिटल इंडिया', "डिजिटल महाराष्ट्र'चा नारा दिला. मात्र, अनेक सरकारी विभाग व स्थानिक स्वराज्य संस्थांनीच त्याला वाटाण्याच्या अक्षता लावल्या. पुणे पोलिसही त्याला अपवाद नाहीत. मोठा गाजावाजा करत सुरू केलेल्या संकेतस्थळाचे अपडेशन तब्बल दोन वर्षांपासून म्हणजेच 2016 पासून रखडले आहे. सरकारी डोमेन आयडी असलेले हे संकेतस्थळ सध्या बंद असून, वेगळेच डोमेन आयडी असलेले संकेतस्थळ सुरू आहे. 

त्या-त्या विभागाचे संकेतस्थळ हे त्या विभागाचा आरसा असतो. संबंधित विभागाची माहिती नागरिक संकेतस्थळावर शोधत असतात. मात्र, संकेतस्थळावरील माहितीअभावी त्यांची कुचंबणा होते. पुणे पोलिसांचे www.punepolice.gov.in हे संकेतस्थळ सध्या बंद असून www.punepolice.co.in हे संकेतस्थळ फक्त इंग्रजीमध्ये सुरू आहे. तेही पूर्णपणे अद्ययावत नाही. माहिती अधिकार कायद्यावर क्‍लिक केल्यास सेवा हमी कायद्याची माहिती उघडते. तर अनेक माहिती मिळविताना तांत्रिक अडचणी येतात. या संकेतस्थळावर एका खासगी संकेतस्थळाची लिंकही देण्यात आली आहे. महाराष्ट्र शासन व पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर www.punepolice.gov.in या संकेतस्थळाची लिंक दिली आहे. मात्र, हे संकेतस्थळ सध्या पूर्णपणे बंद आहे. 

अपडेशन हवेच 
संकेतस्थळावर अनोळखी मृतदेहाची यादी, हरवलेली व्यक्ती व बालकांची यादी, बेवारस वाहनांची यादी व अपघात भरपाई अहवाल, परिपत्रक, आदेश, अचिवमेंट, अपील टायटल, जनजागृती तसेच तर तडीपार यादी, एनसीआरबी, चोरीची वाहने, वाहतूक शाखा व तक्रार निवारण आदी माहिती कायम अद्ययावत ठेवणे गरजेचे आहे. 

बदली, निवृत्त अधिकाऱ्यांची माहिती 
2016 नंतर संकेतस्थळ अपडेट केलेले नाही. त्यामुळे पिंपरी विभागाचे सहायक आयुक्त अद्यापही मोहन विधाते दिसत आहे. तर, वैशाली माने (चतृःश्रृंगी), नुरमहम्मद शेख (वाकड), प्रभाकर ढगे (सांगवी), संजय नाईके (निगडी), गणेश मोरे (भोसरी), रवींद्र चौधरी (एमआयडीसी) अशा अनेक अधिकाऱ्यांच्या बदल्या तसेच निवृत्ती होऊनही त्यांचा संकेतस्थळावर नाम्मोलेख आहे. काही वरिष्ठ अधिकाऱ्यांचे फोटो अपलोड नाहीत, तर आहेत त्यांचीही गुणवत्ता खराब आहे. 

नागरिकांना माहिती मिळण्यासाठी नवीन वेबसाइट सुरू केली आहे. तसेच सरकारी डोमेन आयडी असलेली वेबसाइटही सुरू आहे. 
- नीलेश मोरे, सहायक आयुक्त, सायबर शाखा, पुणे पोलिस. 

Web Title: Pune Police's website awaiting for updates