पुणे : राजकीय कार्यकर्त्यांकडून शहराचे विद्रुपीकरण

कोथरूड,शिवाजीनगर भागात अनाधिकृत फ्लेक्सचे वाढते प्रमाण
 फ्लेक्स
फ्लेक्सsakal

शिवाजीनगर: सार्वजनिक ठिकाणी अनाधिकृत फ्लेक्स लावणे बेकादेशीर असताना देखील चौका-चौकात दादा,मामा,काका,भाऊ, आण्णा यांच्या वाढदिवसानिमित्त, जयंती उत्सव अशा अनेक प्रकारच्या कार्यक्रमानिमित्त शेकडो फ्लेक्स दिसून येतात.राजकीय नेता पुणे शहरात येणार असेल तर ज्या रस्त्यावरून संबंधित नेता येणार आहे तो रस्ता झेंडे आणि फ्लेक्सने भरलेलाचा असतो.कोरोनानंतर शहर पुर्व पदावर येत असताना, महापालिकेची निवडणुकी डोळ्यासमोर ठेवून वरिष्ठ नेत्यांना खुश करण्यासाठी अनाधिकृत फ्लेक्स लावून शहराचे विद्रुपीकरण केले जात आहे.

महापालिका प्रशासनाकडून कारवाई करताना देखील दूजाभाव केला जातो, राजकीय दबावापोटी विशिष्ट नेत्यांचे, व्यावसायाचे फ्लेक्स काढले जात नाहीत.या संदर्भात मॉडेल कॉलनी येथील रहिवासी शामला देसाई म्हणाल्या,महापालिका फ्लेक्स काढण्याची मोहिम राबवते.मात्र फ्लेक्स काढून सांगाडा जागेवर का ठेवला जातो? एवढे फ्लेक्स लावेपर्यत अधिकारी जागे का होत नाहीत? कारवाईत दिरंगाई केल्याबद्दल संबंधित अधिकाऱ्यांना महापालिकेने दंड करायला हवा.

फ्लेक्स लावण्याचं प्रमाण फार वाढलं आहे.फ्लेक्स लावून स्वताचा गौरव करणं हाच उद्देश असतो, नागरिकांसाठी त्याचा काही उपयोग होत नाही.दिलसेंदिवस वाढतच चाललं आहे.नेते मंडळी, प्रशासन यांनी हे थांबवलं पाहिजे.लावायचे आणि पुन्हा काढायचे यासाठी श्वैयवाद घेतला जातो.मुळात हे झालं का? यासाठी खासदार, आमदार, नगरसेवक प्रशासन यांनी विचार करायला हवा.शहराची संस्कृती, गुणवत्ता जपली पाहिजे.

- विक्रम मोहिते अध्यक्ष मॉडेल कॉलनी परिसर सुधारणा समिती.

हा भाग उच्चभ्रू असून शाळा महाविद्यालये या ठिकाणी आहेत.परदेशातील विद्यार्थी, नागरिक भरपूर प्रमाणात आहेत. आपली संस्कृती जपली पाहिजे.स्मार्ट सिटी म्हणून शहर घोषित झाले असताना फ्लेक्स लावणे निषेधार्थ आहे.जेष्ठ नागरिकांना पदपथावरुन चालतात फ्लेक्सचा अडथळा होतो.

- प्रशांत वेलणकर रहिवासी एरंडवणे

अतिक्रमण विभागाकडून मनुष्यबळ उपलब्ध होईल तशी कारवाई केली जाते.नियमित कारवाई करतो.गुन्हे दाखल करण्यासंदर्भात पोलिसांना पत्र दिले आहेत. आकाशचिन्ह विभाग शिवाजीनगर,घोले रस्ता क्षेत्रीय कार्यालयामार्फत आम्ही चौघेजण काम पाहतो.

- मिलिंद काळोखे आकाशचिन्ह व परवाना विभाग शिवाजीनगर,घोले रस्ता क्षेत्रीय कार्यालय

कोथरूड एरिया खूप मोठा आहे.कारवाई करण्यासाठी तीन कर्मचारी,एक चारचाकी गाडी,मी एकूण चौघेजण आहोत.मनुष्यबळ कमी पडते, आरोग्य विभागाच्या पाच कर्मचाऱ्यांची नेमणूक आमच्याकडे केली आहे.परंतू ते अजून रूजू झाले नाहीत.नियमित कारवाई केली जाते.

- संतोष गोंधळेकर आकाशचिन्ह व परवाना विभाग कोथरूड क्षेत्रीय कार्यालय.कोथरूड

मागील महिन्यात कारवाई - एकूण अठराशे सत्तर फ्लेक्स व बॅनर

दंड वसूल - पन्नास हजार

शिवाजीनगर

मागील महिन्यात कारवाई - एकूण दोन ते अडीच हजार फ्लेक्स व बॅनर

दंड वसूल - पाच हजार रुपये

या ठिकाणी असतात सर्वाधिक फ्लेक्स व बॅनर

कोथरूड परिसर :

पौड रस्ता फाटा,अखिल पौंड रोड नवरात्र उत्सव समिती परिसर,मोरे विद्यालय चौक,आनंदनगर,संगीता हॉटेल चौक,

समर्थ हॉटेल,गुजरात कॉलनी रस्ता,वनाज कॉर्नर, स्वामी विवेकानंद रस्ता,कोथरूड पोलिस ठाणे,जगतगुरु तुकाराम महाराज प्रवेशद्वार,

महाराजा कॉम्प्लेक्स सिंग्नल,कोथरूड बस डेपो समोर,ओमकार सह गृह रचना संस्था परिसर.

कर्वे रस्ता : मृत्युंजय मंदिरासमोर,मयुर कॉलनी, कर्वे पुतळा,

डि.पी.रस्ता : छत्रपती शिवाजी महाराज पुतळा,भेलके चौक,शिवतारा गार्डन सोसायटी परिसर आशिष गार्डन समोर,सृष्टी सोसायटी परिसर,शांतीबन चौक

कोथरूड अंतर्गत

कै निळू फुले उद्यान,कै.वस्ताद बलभीम खंडुजी मोकाटे जलतरण तलाव गुजरात कॉलनी.

एरंडवणे,प्रभात रस्ता, भांडारकर रस्ता, डेक्कन जिमखाना परिसर,कमला नेहरू उद्यान, कर्वे रस्ता.

शिवाजीनगर

सेनापती बापट रस्ता, जंगली महाराज रस्ता, गोपाळ कृष्ण गोखले ( फर्ग्युसन) रस्ता, विद्यापीठ रस्ता, मॉडेल कॉलनी,दीप बंगला चौक,कुसाळकर चौक, बारामती हॉस्टेल समोर, शिवाजीनगर गावठाण, डेक्कन जिमखाना, गोखलेनगर मुख्य रस्ता, अरुण कदम चौक,गुडलक चौक, मुळारस्ता येथील अरगडे कॉर्नर, दास चौक, सर्कल चौक, वाकडेवाडीत ग.दि माडगूळकर भुयारी मार्गा प्रवेशद्वार, पाटील इस्टेट उड्डाणं पुलाच्या खाली.

अनधिकृत जाहिरात फलकाची तक्रार कोणाकडे करावी?

टोल फ्री क्र. 18002336679, किंवा इमेल आयडी skysign@punecorporation.org या सदराखाली नागरीकांना तक्रार नोंदविता येणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com