विरोधकांनी खेळल्या खड्ड्यांत गोट्या

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 29 ऑगस्ट 2018

पुणे - शहरातील रस्त्यांवर ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यांकडे महापालिकेचे लक्ष वेधण्यासाठी महापालिकेतील जुन्या पदाधिकाऱ्यांनी स्वारगेट येथील जेधे चौकात ‘गोट्या’ आणि ‘विट्टी-दांडू’ खेळून आंदोलन केले. 

पुणे - शहरातील रस्त्यांवर ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यांकडे महापालिकेचे लक्ष वेधण्यासाठी महापालिकेतील जुन्या पदाधिकाऱ्यांनी स्वारगेट येथील जेधे चौकात ‘गोट्या’ आणि ‘विट्टी-दांडू’ खेळून आंदोलन केले. 

गेली काही दिवस सतत पडणाऱ्या पावसाने शहरातील अनेक रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहतूक कोंडीने त्रस्त झालेल्या पुणेकरांना आणखी मनःस्ताप होत आहे. वाहतुकीचा वेग मंदावला असून, अपघातही वाढले आहेत. याकडे लक्ष वेधण्यासाठी काँग्रेसचे प्रदेश सचिव संजय बालगुडे यांनी खड्ड्यांत हा खेळ मांडला. यात माजी महापौर शांतिलाल सुरतवाला, अंकुश काकडे, माजी उपमहापौर सतीश देसाई, काँग्रेसचे पदाधिकारी बाबा नायडू, अप्पा शेवाळे, ऋषिकेश बालगुडे आदी उपस्थित होते. पुणे शहरातील खड्डे बुजवा नाही तर महापौरांनी राजीनामा द्यावा, अशा घोषणा या वेळी देण्यात आल्या. 

Web Title: pune pothole issue