पुणे : जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन, ‘पीएफआय’चे ४२ कार्यकर्ते ताब्यात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

agitation

केंद्रीय तपास यंत्रणा (एनआयए) आणि एटीएसने देशभरात विविध राज्यांमध्ये छापे गुरुवारी टाकून ‘पीएफआय’च्या शंभर कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे.

पुणे : जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन, ‘पीएफआय’चे ४२ कार्यकर्ते ताब्यात

पुणे - देशभरात छापेमारी करून पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेतल्याच्या निषेधार्थ शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करणाऱ्या पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या (पीएफआय) ४२ पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

केंद्रीय तपास यंत्रणा (एनआयए) आणि एटीएसने देशभरात विविध राज्यांमध्ये छापे गुरुवारी टाकून ‘पीएफआय’च्या शंभर कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे. बेकायदेशीर कृत्य केल्याच्या संशयावरून एनआयए आणि एटीएसने ही कारवाई केली आहे.

पुण्यातील कोंढव्यातही ‘पीएफआय’च्या मुख्य कार्यालयात छापा टाकून काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले होते. त्याचा निषेध करण्यासाठी ‘पीएफआय’ संघटनेने शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. परंतु पोलिसांनी आंदोलनाला परवानगी नाकारली होती. तरीही पदाधिकारी आणि कार्यकर्ते जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दुपारी चार वाजण्याच्या सुमारास एकत्रित येत ठिय्या आंदोलन सुरू केले. या वेळी कार्यकर्ते घोषणाबाजी करीत होते. त्यापैकी ४२ कार्यकर्त्यांना बंडगार्डन पोलिसांनी ताब्यात घेतले. तर, उर्वरित काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी घरी जाण्याच्या सूचना दिल्या.

Web Title: Pune Protest In Front Of Collector Office 42 Workers Of Pfi Arrested Crime

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..