Pune : कचरा टाकणाऱ्यांवर करडी नजर

सार्वजनिक जागा : भूगाव ग्रामपंचायतीकडून कारवाईला सुरुवात
pune
punesakal

बावधन : भूगाव (ता. मुळशी) येथे सार्वजनिक जागेवर बेफिकीरपणे कचरा टाकणाऱ्यांवर ग्रामपंचायत आता करडी नजर ठेवणार असून कचरा टाकणाऱ्यांवर ग्रामपंचायतीकडून दंडात्मक कारवाईला सुरूवात केली आहे. संपूर्ण गावात ग्रामस्वच्छता अभियान राबवून ग्रामपंचायतीने सात ट्रॉली कचरा गोळा केला.

भूगावमध्ये घरगुती कचरा गोळा करण्यासाठी ग्रामपंचायतीने घंटागाडीची सोय केली आहे. परंतु फ्लॅटमध्ये राहणारे नागरिक पुण्याच्या नोकरीसाठी निघताना घरातील कचरा प्लास्टिकच्या पिशवीत भरतात. चालत्या गाडीतून कचऱ्याची पिशवी रस्त्याच्या कडेला फेकतात. त्यामुळे कचऱ्याचा ढीग साचला की, ग्रामपंचायत ती उचलून नेते. भटकी कुत्री, जनावरे, वेगवेगळे पक्षी हा कचरा इतरत्र पसरवितात. कचऱ्याच्या घाणीमुळे संसर्ग आजाराचाही फैलाव होवू लागला आहे.

याबाबत घेतलेल्या बैठकीस सरपंच वनिता तांगडे, उपसरपंच संकेत कांबळे, माजी सरपंच निकिता सणस, माजी उपसरपंच राहुल शेडगे, सुरेखा शेडगे, अर्चना सुर्वे, सदस्य कालिदास शेडगे, उद्योजक रमेश सणस, नारायण करंजावणे तसेच ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते. गावात २ ऑक्टोबरपर्यंत ग्रामस्वच्छता मोहीम राबविण्यात येणार आहे. अभियानाचा प्रारंभ करताना पहिल्याच दिवशी सात ट्रॉली कचरा सार्वजनिक ठिकाणाहून गोळा करण्यात आला.

गावात सार्वजनिक ठिकाणचा कचरा दररोज गोळा केला जातो. तरीसुद्धा नागरिक पुन्हा त्याच ठिकाणी कचरा टाकतात. त्यामुळे डास, कीटक, चिलटे, माश्‍या यांची उत्पत्ती वाढते. मानवाच्या आरोग्यावरही त्याचा परिणाम होतो. त्यामुळे ग्रामपंचायतीने ही मोहीम हाती घेतली आहे.

- वनिता तांगडे, सरपंच, भूगाव

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com