पुणे : भिडे पुलाजवळ बॅरिकेड ठेवण्यास सुरुवात; वाहतूक सुरळीत

putting up barricades near the Bhide bridge as water Discharge from Khadakwasla dam started
putting up barricades near the Bhide bridge as water Discharge from Khadakwasla dam started

पुणे : खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु झाल्याने डेक्कन वाहतूक शाखेकडून भिडे पुलाजवळ रस्त्याच्याकडेला बॅरिकेड ठेवण्यास सुरु करण्यात आले आहे. पाण्याची पातळी वाढण्याच्या पार्श्वभुमीवर पोलिसांकडून पूर्वतयारी केली जात आहे. मात्र सध्या तरी वाहतूक सुरळीत सुरु आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

खडकवासला धरण साखळीमध्ये मागील काही दिवसांपासून पावसाची संततधार सुरु आहे. त्यामुळे धरणातील पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे. सध्या खडकवासला धरणाचे 6 दरवाजे 1 फुटाने तर 5 दरवाजे अर्ध्या फुटाने उघडले यातून 7276 क्यूसेक पाणी मुठा नदीत सोडले आहे. सध्या पाण्याचा विसर्ग कमी आहे, मात्र काही दिवसात तो वाढण्याची शक्यता आहे. पाणी वाढल्यास डेक्कन येथील भिडे पुल पाण्याखाली जाईल, त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून डेक्कन वाहतूक शाखेकडून भिडे पुलाजवळ बॅरिकेड आणून ठेवण्यास सुरुवात झाली आहे.

रात्रभर पाऊस; खडकवासला धरणाचे एक फुटाने उघडले सहा दरवाजे

याविषयी डेक्कन वाहतूक विभागाचे पोलिस उपनिरीक्षक बोठे म्हणाले, "खडकवासला धरणातून काही प्रमाणातच पाण्याचा विसर्ग सुरु झाला आहे. मोठा विसर्ग सुरु झाल्यानंतर भिडे पुल व रजपूत झोपडपट्टीकडे जाणाऱ्या नदीपात्रातील रस्त्यावर पाणी येऊ शकते. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून आम्ही भिडे पुलाजवळ बॅरिकेड आणून ठेवण्यास सुरुवात केली आहे. पाणी पातळी वाढ़ीबाबत आम्हाला महापालिका प्रशासनाकडून अद्याप माहिती देण्यात आलेली नाही." 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com