काय सांगता? पुणे रेल्वेने 1 लाख 93 हजार प्रवाशांना दिला 'एवढ्या' कोटींचा परतावा

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 29 जून 2020

कोरोनामुळे 22 मार्चपासून रेल्वे वाहतूक बंद झाली होती. मात्र एक जूनपासून रेल्वे वाहतूक काही प्रमाणात सुरू झाली आहे.  सध्या देशातील सुमारे दोनशे मार्गांवर रेल्वे वाहतूक सुरू आहे. त्या शिवाय मजूर, कामगारांची वाहतूक करणाऱ्या 'श्रमिक स्पेशल' या गाड्या देखील सुरू आहेत. 

पुणे: कोरोनाच्या लॉकडाउनमध्ये रद्द झालेल्या रेल्वेगाड्यांच्या 1 लाख 93 हजार प्रवाशांना सुमारे 13 कोटी रुपयांचा परतावा मध्य रेल्वेच्या पुणे विभागाने नुकताच दिला आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

कोरोनामुळे 22 मार्चपासून रेल्वे वाहतूक बंद झाली होती. मात्र एक जूनपासून रेल्वे वाहतूक काही प्रमाणात सुरू झाली आहे. सध्या देशातील सुमारे दोनशे मार्गांवर रेल्वे वाहतूक सुरू आहे. त्या शिवाय मजूर, कामगारांची वाहतूक करणाऱ्या 'श्रमिक स्पेशल' या गाड्या देखील सुरू आहेत. 

'पुण्याची पीएमपी व्हेंटिलेटरवर; करार रद्द करण्यासाठी कंत्राटदारांना नोटिस

कोरोनामुळे रेल्वे गाड्या रद्द झाल्यावर त्याच्या तिकिटांचा परतावा देण्यासाठी मध्य रेल्वेच्या पुणे विभागाने पुणे स्टेशनवर तीन खिडक्या उघडलेल्या आहेत. त्याच्यात रद्द झालेल्या गाड्यांच्या तिकिटांचे पैसे प्रवाशांना परत देण्यात येत आहेत. ज्या प्रवाशांनी तिकिटे ऑनलाईन घेतलेली आहेत, त्यांना ऑनलाइन पद्धतीने परतावा मिळत आहेत तर ज्यांनी काउंटरवर घेतलेली आहेत, त्यांना काउंटरवरच तिकिटांचा परतावा दिला जात आहे. पुढील तीन महिने ही प्रक्रिया सुरूच राहणार असल्याची माहिती मध्य रेल्वेच्या पुणे विभागाचे जनसंपर्क अधिकारी मनोज जवळ यांनी 'सकाळ'शी बोलताना दिली. यात लांब पल्ल्याच्या गाड्यांचा ही समावेश आहे. पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, मिरज स्थानकांवर तिकिटांचा परतावा सध्या दिला जात आहे, असेही त्यांनी सांगितले. 

StartupStory: सोशल डिस्टन्सिंगसाठी तरुणानं डोकं लढवलं; तुम्हीही कराल कौतुक

रेल्वे गाड्या केव्हा सुरू होणार याबद्दलचा निर्णय अद्याप झालेला नाही. आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक सेवा 15 जुलैपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. त्या नुसार  रेल्वे गाड्याही 15 जुलैनंतर सुरू होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. 
 

प्राथमिक ऊर्जावापरात भारत तिसऱ्या स्थानावर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pune Railway gave13 crore refund to 1 lakh 93 thousand passengers