esakal | लोहमार्ग पोलिसांचे दातृत्व; पुण्यासह 4 जिल्ह्यांना दिला मदतीचा हात

बोलून बातमी शोधा

Pune Railway Police

पुणे, नगर, सोलापूर आणि सांगली या जिल्ह्यात कोरोना रुग्ण संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामध्ये स्थानिक पोलिसांनाही मोठ्या प्रमाणात कोरोनाची लागण होत आहे.

लोहमार्ग पोलिसांचे दातृत्व; पुण्यासह 4 जिल्ह्यांना दिला मदतीचा हात
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : कोरोनाचा संसर्गाचा वाढता प्रभाव लक्षात घेऊन विविध समाजघटक आरोग्य व जिल्हा प्रशासनाच्या मदतीसाठी धावून येत असताना आता सरकारी यंत्रणा देखील पुढे सरसावल्या आहेत. पुणे लोहमार्ग पोलिस विभागाने त्यांच्याकडील ऑक्सिजन आणि अन्य अत्यावश्यक वैद्यकीय साहित्य पुण्यासह 4 जिल्ह्यांतील कोरोनाग्रस्त पोलिसांच्या उपचारासाठी देण्याचे दातृत्व दाखवून दिले आहे.

हेही वाचा: 17 राज्यात कोरोनाची लस फ्री; पाहा संपूर्ण यादी

पुणे, नगर, सोलापूर आणि सांगली या जिल्ह्यात कोरोना रुग्ण संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामध्ये स्थानिक पोलिसांनाही मोठ्या प्रमाणात कोरोनाची लागण होत आहे. त्यांच्यावर उपचार करताना जिल्हा आणि आरोग्य यंत्रणेला तारेवरची कसरत करावी लागत आहे. बहुतांश ठिकाणी ऑक्सिजन, व्हेंटीलेटर, रेमडेसिव्हीर आणि अन्य वैद्यकीय साहित्य अपुरे पडत आहे.

या परिस्थितीची पुणे लोहमार्ग पोलिस दलाचे अधीक्षक सदानंद वायसे पाटील यांनी गांभीर्याने दखल घेतली. कोरोनापासून पोलिस अधिकारी आणि कर्मचारी वर्गाचा बचाव व्हावा, यासाठी पाटील यांच्या पुढाकारातून चार जिल्ह्यातील पोलिसांसाठी प्राथमिक आरोग्य सुविधा आणि साधने उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत. त्यानुसार, पुणे लोहमार्ग पोलिसांकडून जिल्हाधिकारी कार्यालयास काही साहित्य उपलब्ध करून दिले जात आहे.

हेही वाचा: राज्याला केंद्राकडून रेमडेसिव्हिरची मदत; ठाकरेंनी मानले मोदींचे आभार

पुणे लोहमार्ग पोलिसांनी फेब्रुवारी महिन्यात ऑक्सिजन कंनस्ट्रेट, वोझोन जनरेटर, बीपी ऐप डिजीटल बफरर, ग्लुकोमीटर, डिजीटल वेट मशिन, गरम आणि ठंड पिण्याच्या पाण्याचे मशिन असे साहित्य खरेदी केले होते. हे साहित्य पुणे लोहमार्ग पोलिसांनी पुणे, नगर, सांगली आणि सोलापूर या 4 जिल्ह्यांसाठी उपलब्ध करुन दिले आहेत. त्यामुळे आरोग्य विभागाला काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.

हेही वाचा: 'तृणमूल'च्या उमेदवाराचं कोरोनामुळे निधन

"राज्यात कोरोना संसर्ग वेगाने पसरत आहे. आरोग्य यंत्रणाकडे असलेली साधने आता अपुरी पडत आहेत. त्यामुळेच आम्ही आरोग्य यंत्रणेला आवश्यक वैद्यकीय साहित्य देत आहोत. त्या-त्या जिल्हाधिकारी कार्यालयाशी आम्ही पत्रव्यवहार केला आहे. अन्य सरकारी विभागानेही असा मदतीचा हात देण्याची आता गरज आहे."

- सदानंद वायसे पाटील, पोलिस अधीक्षक, पुणे लोहमार्ग पोलिस