Pune : मंचर शहर व परिसरात मुसळधार पावसाने पिकांचे व शेत जमिनीचे मोठ्या प्रमाणात नुकसान

शेतकरी हवालदिल कृषी खात्यामार्फत पंचनामे सुरू
Pune
Punesakal

मंचर : मंचर शहर व परिसरात शनिवार पासून सतत झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक शेतकऱ्यांची पिके पाण्याखाली गेली. त्यामुळे सोयाबीन, गाजर, मका, फुले, मेथी, कोथंबीर व तरकारी मालाचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे. कृषी खात्याने पंचनामे सुरु केले असून मंगळवार दुपारपर्यंत ९० शेतकऱ्यांचे ८५ एकर क्षेत्राचे नुकसान झाले आहे. काही ठिकाणी पिकांबरोबर बांध व जमीनही वाहून गेली आहे. त्यामुळे शेतकरीवर्ग हवालदिल झाला आहे.

झालेला पाऊस हा शेती पिकांना नुकसान करणारा ठरत आहे. शेतातील खुरपणी किंवा तरकारी लागवडीची कामे रखडली आहेत. सद्यस्थितीत अजून पाऊस चालूच राहिल्यास शेती पिके पूर्णपणे नष्ट होण्याची भीतीही शेतकऱ्यानी व्यक्त केली आहे. हवामान खात्याने शनिवार (ता.१७) पर्यंत पावसाचा अंदाज दिल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.

भाजप किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष संजय थोरात यांनी आंबेगाव तालुक्याच्या तहसीलदार रमा जोशी यांना मंचर परिसरात शेतीपिकासह नुकसान झाल्याची माहिती दिली. त्वरित नुकसानीचे पंचनामे करण्याची हि मागणी केली होती. त्यानुसार मंगळवारी तालुका कृषी अधिकारी टी.के.चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली मंडल कृषी अधिकारी नरेंद्र वेताळ, कृषी सहाय्यक राजश्री पवार यांनी पंचनाम्याचे काम सुरु केले आहे.

एस कॉर्नर, लोंढेमळा, गांजाळे मळा, भीलौढीवस्ती या भागात संजय थोरात, नवनाथ थोरात यांनी कृषी कर्मचाऱ्यासमवेत पाहणी दौरा केला. मनोज रामदास बेंडे, कालिदास गांजाळे, अरुण लोंढे, कैलास गांजाळे, अनिल थोरात, आनंदा गांजाळे, रामदास बढे, अनिल गांजाळे, बाळासाहेब गांजाळे, श्रीराम गांजाळे आदी शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.मंचर (ता.आंबेगाव) : मुसळधार पावसामुळे मनोज बेंडे यांच्या फुल शेती नुकसानीचा पंचनामा प्रसंगी कृषी सहाय्यक राजश्री पवार (उजवीकडून तिसऱ्या) व अन्य. मंचर (ता.आंबेगाव) : मुसळधार पावसामुळे गाजर पिकांचे झालेले नुकसान.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com