भीमा खोऱ्यातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाची विश्रांती

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 1 October 2020

जिल्ह्यातील भीमा खोऱ्यातील केवळ येडगाव धरण वगळता सर्व धरणांच्या पाणलोट क्षेत्रात बुधवारी दिवसभरात पावसाने विश्रांती घेतली.

पुणे-  जिल्ह्यातील भीमा खोऱ्यातील केवळ येडगाव धरण वगळता सर्व धरणांच्या पाणलोट क्षेत्रात बुधवारी दिवसभरात पावसाने विश्रांती घेतली. सध्या खडकवासला प्रकल्पातील चार धरणांतील पाणीसाठा 99.77 टक्‍क्‍यांवर (29.09 टीएमसी) पोचला आहे. गतवर्षी या प्रकल्पातील पाणीसाठा 99.32 टक्‍के (28.96 टीएमसी) होता. येडगाव धरणाच्या पाणलोट क्षेत्रात दिवसभरात पाच मिलिमीटर पावसाची नोंद झाली. 

यंदाच्या पावसाळ्यात खडकवासला धरणातून आजपर्यंत 11.19 टीएमसी पाणी मुठा नदीतून सोडण्यात आले आहे. सध्या खडकवासला धरणातून विसर्ग बंद करण्यात आला आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

खडकवासला प्रकल्पातील पाणीसाठा जवळपास 100 टक्के इतका आहे. यात खडकवासला पानशेत आणि वरसगाव 100 टक्के भरले असून खडकवासला आणि टेमघर 99 टक्के भरलं आहे. 

खडकवासला प्रकल्पातील पाणीसाठा टीएमसीमध्ये (कंसात टक्‍केवारी) : 
खडकवासला 1.96 (99.16) 
पानशेत 10.65 (100) 
वरसगाव 12.82 (100) 
टेमघर 3.66 (98.65) 

हे वाचा - पुणे जिल्ह्यातील वजनदार मंत्र्यांच्या खासगी सचिवाने झेडपीत थाटले कार्यालय

याशिवाय इतर प्रमुख धरणंसुद्धा पूर्ण भरली आहेत. पवना, भामा आसखेड, चासकमान, डिंभे धरणांमधील पाणीसाठी 99 टक्क्यांहून जास्त आहे. तर इतर धरणे जवळपास पूर्ण क्षमतेनं भरली आहेत.

इतर प्रमुख धरणांतील पाणीसाठा टीएमसीमध्ये (कंसात टक्‍केवारी) : 
पवना 8.48 (99.72) 
भामा आसखेड 7.57 (98.73) 
मुळशी 18.46 (100) 
केळमोडी 1.51 (100) 
चासकमान 7.49 (98.84) 
आंद्रा 2.92 (100) 
गुंजवणी 3.69 (100) 
भाटघर 23.51 (100) 
नीरा देवघर 11.73 (100) 
वीर 9.41 (100) 
डिंभे 12.49 (99.96) 
उजनी 53.57 (100) 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pune rain dam water level full rain stop