Pune Rains :  गुरुराज सोसायटीत अजूनही धास्ती

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 5 ऑक्टोबर 2019

बिबवेवाडी - पुराचे संकट झेललेली गुरुराज सोसायटी पुन्हा सावरत असली तरी, रहिवाशांमध्ये अजूनही धास्ती आहे. सोसायटीची सीमाभिंत पडली असल्याने पुन्हा मोठा पाऊस झाल्यावर पाणी आत शिरण्याचा धोका आहे. 

बिबवेवाडी - पुराचे संकट झेललेली गुरुराज सोसायटी पुन्हा सावरत असली तरी, रहिवाशांमध्ये अजूनही धास्ती आहे. सोसायटीची सीमाभिंत पडली असल्याने पुन्हा मोठा पाऊस झाल्यावर पाणी आत शिरण्याचा धोका आहे. 

सातारा रस्त्यावरील गुरुराज सोसायटी ही आंबिल ओढ्यालगत पद्मावती पुलाशेजारी आहे. काल (शुक्रवारी) झालेल्या पावासात ओढ्यातील पाण्याची पातळी वाढून सोसायटीत पाणी शिरले होते. सीमाभिंत पडलेल्यामुळे पाण्याची पातळी वाढल्यावर लगेचच सोसायटीत पाणी येत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पुरामुळे सोसायटीतील सुमारे शंभरपेक्षा जास्त कुटुंबांनी सोसायटी सोडली असून, नातेवाइकांकडे आधार घेतलेला आहे. ओढ्याच्या पाण्यात वाहून आलेली वाहने काढण्यासाठी चारचाकी वाहनाला सरासरी दोन ते तीन हजार रुपये दर आकारला जात असून, त्याची वाहतूक करण्यासाठी दोन ते अडिच हजार रुपये घेतले जात आहेत.  

महापालिका प्रशासनाने स्वच्छतेचे काम सुरू केले आहे. प्रशासनाने सीमाभिंत बांधून द्यावी. 
- संजय शेठ, रहिवासी, गुरुराज सोसायटी

गुरुराज सोसायटीच्या परिसरातून अंदाजे पाचशे टन गाळ काढला आहे. दिवसरात्र स्वच्छता करण्याचे काम सुरू आहे. 
- अविनाश सकपाळ, सहायक आयुक्त, बिबवेवाडी क्षेत्रीय कार्यालय 

ओढ्यालगतच्या खासगी सोसायट्यांच्या सीमाभिंत सोसायट्यांनी बांधायच्या आहेत. महापालिका स्वच्‍छता करीत आहे. 
- माधव देशपांडे, उपायुक्त, महापालिका


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pune rain Gururaj society