
Pune Rain: पुण्यात गारांसह मुसळधार पाऊस, उकाड्यापासून नागरिकांना दिलासा
पुणे शहर आणि परिसरात दुपारपासून उन्हाच्या झळ्या कमी झाल्या होत्या पण ढगाळ वातावरणामुळं उकाडा जाणवत होता. अखेर संध्याकाळी ५ वाजण्याच्या सुमारास शहरात पावसानं दमदार हजेरी लावली. औंध, पाषाण भागात तर गारांसह पावसानं जोरदार पाऊस झाला. (Pune Rain starts in Pune with hail relief to citizens from heat)
शहरातील औंध, पाषाण, कोथरुड, शिवाजीनगर या भागात मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. अचानक जोरदार पावसाला सुरुवात झाल्यानं नागरिकांची धांदल उडाल्याचं पहायला मिळालं. यामुळं रस्त्यांवर वाहनचालकांची चांगलीच तारांबळ उडालेलं पहायला मिळालं. (Pune Rain)

पाषाण येथे गारांसह पावसाला सुरुवात

शिवाजीनगर गावठाणात पावसाला सुरुवात

सकाळ नगर, पंचवटी, पाषाण, सूस रस्ता, सूस गाव व महाळुंगे इथं गारांसह पाऊस
लोहगाव परिसरात विजांचा कडकडाट, मात्र पावसाच्या तुरळक सरी कोसळत आहेत. तसेच मुंढवा-केशवनगर-खराडी भागातही पावसाला सुरुवात झाली आहे.