Pune Rains : तासाभराच्या पावसाने पुणेकर अडकले कोंडीत

टीम ई-सकाळ
सोमवार, 4 नोव्हेंबर 2019

हडपसर रस्त्यावर एएफएमसी पासून ते गाडीतळ पर्यंत वाहतूक कोंडी झाली आहे. हडपसर पासून सोलापुर रस्त्याला वाहतूक सुरळीत आहे परंतू पंढरपुर रस्त्यावर भेकराईनगर पर्यंत वाहतूक मंद गतीने सुरु आहे.

पुणे : पुण्यात तासभर पडलेल्या पावसाने रस्ते जलमय झाले आहेत. परिणामी वाहतूकीवर परिणाम झाला आहे. साचलेल्या पाण्यामुळे वाहतूकीचा वेग मंदावला असून पुण्यात काही भागात वाहतूक कोंडी झाली आहे. 

- पुणे : तो मसाज करण्यासाठी गेला अन्...

पुणेकरांनी, वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पर्यायी रस्त्यांचा वापर करावा. जलमय झालेल्या रस्त्यांमधून वाट काढण्यासाठी वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे. 

- कार्तिकी एकादशीनिमित्त ST सोडणार तब्बल 'एवढ्या' जादा गाड्या

No photo description available.

या भागातील रस्त्यांवर वाहतूक कोडी 
- पश्चिम बाह्यवळण महामार्गावरील बावधन ते वारजे वाहतूक संथ गतीने सुरु
- नरवीर तानाजी मालुसरे रस्त्यावर  कोंडी झाली असून वाहतूक संथ गतीने सुरु
- जंगली महाराज रस्त्यावरही कोंडी झाली आहे. 
- पुणे सातारा रस्त्यावर देखील वाहतूक मंद गतीने सुरु आहे.
- गणेश खिंड येथील रस्त्यावरही मोठी कोंडी झाल्याने वाहतूक मंदावली
- हडपसर रस्त्यावर एएफएमसी पासून ते गाडीतळ पर्यंत वाहतूक कोंडी झाली आहे. हडपसर पासून सोलापुर रस्त्याला वाहतूक सुरळीत आहे परंतू पंढरपुर रस्त्यावर भेकराईनगर पर्यंत वाहतूक मंद गतीने सुरु आहे.

- आता RTO कडून होणारी लूट थांबणार, 'हा' आहे नवा प्लान..

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pune Rain Traffic Jam in pune due to heavy rainfall