Pune Rain : कोथरूड येथील घरांत शिरले पावसाचे पाणी!

Pune-Rain
Pune-Rain

पौडरस्ता : कोथरूड येथील जय भवानी नगर मधील काही घरात पावसाचे पाणी शिरले. त्यामुळे चाळीत शिरलेले पाणी काढण्यासाठी येथील रहिवाशांची तारांबळ उडाली. 

जय भवानी नगरमध्ये काही महिन्यांपूर्वी सिमेंट क्राँक्रिटचा रस्ता करण्यात आला. मात्र, पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी असलेली लाईन बंद करण्यात आल्यामुळे जय भवानी नगरमधील प्रत्येक चाळीत पाणी साचले होते. तसेच काही नागरिकांच्या घरातही पाणी शिरले. 

चाळ क्र. 2 ब मध्ये जिथून पाणी काढलं जात होतं, त्याखाली वीज पुरवठा करणाऱ्या मोठ्या वायर आहेत. तसेच डीपी खालच्या बाजूंनी उघडे आहेत. त्यामुळे अशा वेळी अपघात होण्याची भीती स्थानिक व्यक्त करत आहेत. चाळ क्र. 5 येथे घरात पाणी शिरल्याने फर्निचर आणि धान्य सामानांचे नुकसान झाले. 

या सर्व परिस्थितीला जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. दोन दिवसांपूर्वी जय भवानी नगर नागरी कृती समितीने तसे निवेदन कोथरूड क्षेत्रीय कार्यालयात दिले आहे. 

वाचा आणखी महत्त्वाच्या बातम्या :

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com