#PuneRains आंबिल ओढ्यालाही पूररेषा हव्यात

Aambil-Odha
Aambil-Odha

पुणे - शहरातून वाहणाऱ्या आंबिल ओढ्याच्या पुराचा धोका दिवसेंदिवस वाढू लागला आहे. त्यासाठी नद्यांच्या धरतीवर या ओढ्यासाठीही पुराचा धोका दर्शविणारी ब्ल्यू (नील) आणि रेड (लाल) सीमारेषा आखली पाहिजे, अशी अपेक्षा तज्ज्ञांनी व्यक्त केली.

शहरात २५ सप्टेंबरला उद्‌भवलेल्या पूरस्थितीवर संभाव्य उपाययोजना काय असाव्यात, हे तज्ज्ञांकडून जाणून घेण्याच्या उद्देशाने मराठी विज्ञान परिषदेच्या वतीने ‘शहरी पूरसमस्या - सत्य व मिथक’ या विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. यात विविध तज्ज्ञांनी सहभाग घेतला.
प्रा. प्रकाश सादगिर, सतीश भिंगारे, मराठी विज्ञान परिषदेच्या पुणे विभागाचे अध्यक्ष राजेंद्र सराफ यांनीही आपले मत मांडले.

नील सीमारेषा ही दर २५ वर्षांनी येणाऱ्या संभाव्य पुराच्या धोक्‍याची, तर रेड सीमारेषा ही दर १०० वर्षांनी येणाऱ्या पुराचा संभाव्य धोका दर्शवत असतात. या दोन्ही रेषांच्या आत निवासस्थाने होणार नाहीत, याची काळजी घेतली पाहिजे.  
- डॉ. दि. मा. मोरे, ज्येष्ठ जलतज्ज्ञ

शहरी भागात भूतलावर पाणी वाहून जाण्याचे प्रमाण पूर्वीच्या तुलनेत चौपटीने वाढले असल्याचे प्रा. सादगिर यांनी सांगितले. शहरातील ओढ्यावर झालेले अतिक्रमण आणि यासाठी बुजविले गेलेले पाण्याचे नैसर्गिक स्रोत हे शहरी पुराचे मुख्य कारण आहे.
- अभिजित घोरपडे 

सद्यःस्थितीत संभाव्य पूर परिस्थितीवर मात करण्यासाठी पूर, धरणाचे प्रचलन आणि पडणारा पाऊस, याबाबत एकत्रितपणे अभ्यास करून त्यावर नियंत्रण आणू शकणारी एकत्रित यंत्रणा अस्तित्वात नाही. मात्र, ती असणे गरजेचे आहे.
- नंदकुमार वडनेरे 

सिंगापूरच्या धरतीवर पुण्यातही हरित पट्ट्यांबरोबरच शहरातील सार्वजनिक ठिकाणी नीलपट्टा (ब्ल्यू स्पेस) निर्माण करावा. कारण, शहरातील अतिरिक्त पाणी या ब्ल्यू स्पेमसध्ये साठवून ठेवता येईल, असे नियोजन सिंगापुरात करण्यात आले आहे. 
- डॉ. वि. वि. भोसेकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com