Pune Rains : उंड्री परिसरात ओढ्याचा मार्ग बदलल्याने शाळेची भिंत कोसळली

डॉ. समीर तांबोळी
गुरुवार, 26 सप्टेंबर 2019

Pune Rains : उंड्री परिसरात बुधवारी रात्री झालेल्या पावसामुळे उंड्रीतील ओढ्याला पुर आला आहे. गेल्या काही वर्षांतील हा सर्वांत मोठा पूर असल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली. पुराचे पाणी परिसरातील सोसायट्या, शाळा, कामगार वसाहतींमध्ये शिरले.

Pune Rains : उंड्री परिसरात बुधवारी रात्री झालेल्या पावसामुळे उंड्रीतील ओढ्याला पुर आला आहे. गेल्या काही वर्षांतील हा सर्वांत मोठा पूर असल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली. पुराचे पाणी परिसरातील सोसायट्या, शाळा, कामगार वसाहतींमध्ये शिरले. अनेक ठिकाणी भिंती कोसळण्याच्या घटना घडल्या. ओढ्यावरील सीमाभिंत कोसळली. सुदैवाने याठिकाणी जिवीत हानी झाली नाही. उंड्री परिसरात अनेक शाळा आहेत. जिल्हाधिकार्‍यांनी शाळेला सुट्ट्या जाहीर केल्याची माहिती शाळांना उशिरा मिळाली. त्यामुळे उंड्रीतील काही शाळा सुरूच होत्या. रस्ते उखडल्यामुळे वाहतूक मंदावली होती. त्यामुळे कडनगर चौकात वाहतूकीची कोंडी झाली होती.

जाणून घ्या, पुण्यात ७२ तासांत कोसळला इतका पाऊस

कोठे काय घडले?

  1. हिल्स न डेल्स सोसायटी, संस्कृती शाळेत ओढ्याच्या पुराचे पाणी शिरले. पावसाबरोबर आलेला कचरा घाण शाळेच्या मैदानावर पसरली आहे.
  2. उंड्री मध्ये सध्या भूमीगत जलवाहिन्यांचे टाकण्याचे काम सुरु आहे. त्याचे पाईप पुराच्या पाण्याबरोबर वाहून रस्त्यात येऊन पडले आहे.
  3. हिल ग्रीन माध्यमिक शाळेला मुख्य रस्त्याला जोडणार्‍या ओढ्यावरील पुलाचा कठडा वाहून गेला. दुसर्‍या बाजूचा कठडा कम्कुवत झाला असून ढासळ्ण्याच्या स्थितीत आहे.
  4. प्रिन्स टाऊन सोसायटी शेजारी रहाणार्‍या सुरक्षा रक्षकाच्या घरात पाणी शिरले. घरातील भांडी, व इतर साहित्य वाहून गेले. साधारण साडे अकराच्या सुमारास पाणी घरात शिरल्यामुळे घरातील सर्वांनी लहान मुलीसह शेजारील जंगलात (उंच जागी) पळ काढला व रात्र काढली
  5. पावसामुळे बिशप शाळेची सीमा भिंत कोसळली. सीमाभिंत अनेक दिवसांपासून नादुरुस्त होती. अनेक वेळा दुरुस्त करण्याबाबत शाळेला तक्रार दिली होती.

अग्निशमन दलाचा देवतदू, टब आणि बाळ

ओढ्याचा मार्ग बदलल्याचा परिणाम?
हिल्स न डेल्स सोसायटीच्या परिसरात, संस्कृती इंटरनॅशनल स्कूल येथे ओढ्या्चा नैसर्गिक मार्ग बदलण्यात आला आहे. पात्राच्या भागात शाळेच्या इमारतीचे बांधकाम करण्यात आले आहे. ओढ्याला पूर आल्यानंतर शाळेत पाणी शिरू शकते ही शक्यता वर्तविण्यात आली होती आणि कालच्या पावसामुळे शाळेच्या आवारात पाणी घुसले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pune rains flood disrupted in undri area school wall collapse