Pune Rains : पुणेकरांना उत्तर द्या...

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 10 ऑक्टोबर 2019

पुणेकर म्हणून आपण काही सुचविणार आहात?
फेसबुक आणि ट्विटरवर #ForBetterPune हॅशटॅग वापरून आम्हाला कळवा किंवा webeditor@esakal.com वर ई-मेल करा.

सकाळ  भूमिका
रस्त्यांमधून उमाळे फुटावेत आणि पाहता पाहता रस्ते ओढ्यांत बदलावेत, अशी परिस्थिती पुण्यात वारंवार निर्माण होत आहे. तासाभराच्या पावसात पुणे बंद पडते, असा अनुभव येत आहे. एरवी वाहनांच्या गर्दीत गुदमरून जाण्याची आणि पाऊस आला, की रस्त्यातल्या ओढ्यापासून जीव वाचविण्यासाठी धावण्याची वेळ पुणेकरांवर येत आहे.

दरवेळी निसर्गाकडे बोट दाखवून महापालिकेला अंग झटकता येणार नाही. रस्त्यांची कामे, पाण्याचा निचरा करणारी ड्रेनेजव्यवस्था, नालेसफाई, झाडांच्या फांद्यांची छाटणी आणि महत्त्वाचे म्हणजे आपत्कालीन विभागाची दक्षता, या गोष्टी अस्तित्वात आहेत की नाहीत, याचे उत्तर महापालिकेने द्यायलाच हवे.

माहिती तंत्रज्ञानात जगात झेंडा रोवणाऱ्या पुण्यात पावसाची नेमकी आणि आगाऊ सूचना देणारी मध्यवर्ती व्यवस्था नागरिकांसाठी उपलब्ध नाही. हवामानाचा अभ्यास करणाऱ्या केंद्रीय संस्था आणि स्थानिक प्रशासन यांच्यात समन्वय असेलच, तर तो नागरिकांच्या उपयोगी पडल्याचे पावसाळ्यात दिसले नाही. महापालिकेला याचेही स्पष्टीकरण द्यावेच लागेल. आगामी काळात महापालिकेचा आराखडा काय आहे, हेही समजले पाहिजे. ज्या क्षेत्रात नागरिकांच्या सहभागाची, ज्ञानाची महापालिकेला आवश्‍यकता आहे; त्या क्षेत्रात नागरिक, स्वयंसेवी संस्था पुढे येतीलच. मात्र, एक पाऊल महापालिकेनेही उचलले पाहिजे.

पुणेकर म्हणून आपण काही सुचविणार आहात?
फेसबुक आणि ट्विटरवर #ForBetterPune हॅशटॅग वापरून आम्हाला कळवा किंवा webeditor@esakal.com वर ई-मेल करा.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pune Rains PMC give answer to Punekar

टॅग्स
टॉपिकस
Topic Tags: