Pune Rains : "ते' दोघे ठरले सात जणांसाठी देवदूत

महेंद्र शिंदे
गुरुवार, 26 सप्टेंबर 2019

Pune Rains : पुराच्या पाण्याने घरांना वेढा घातला होता. बचावासाठी त्या घरांतील सदस्य घरावर चढून बसले होते. पुराच्या पाण्याचे उग्र रूप पाहून त्यांना बाहेर काढण्यासाठी कोणी पुढे येण्याचे धाडस करेना. अशा परिस्थितीत नाना कोंडे कमरेला दोरी बांधून वाहत्या पाण्यात उतरले. त्यांच्या मदतीला रशीद धावून आला आणि त्या दोघांनी पुरात अडकलेल्या त्या सात जणांना सुखरूप बाहेर काढले. नाना कोंडे आणि रशीद हे त्या सात जणांसाठी देवदूतच ठरले.

Pune Rains :

खेड-शिवापूर (पुणे) : पुराच्या पाण्याने घरांना वेढा घातला होता. बचावासाठी त्या घरांतील सदस्य घरावर चढून बसले होते. पुराच्या पाण्याचे उग्र रूप पाहून त्यांना बाहेर काढण्यासाठी कोणी पुढे येण्याचे धाडस करेना. अशा परिस्थितीत नाना कोंडे कमरेला दोरी बांधून वाहत्या पाण्यात उतरले. त्यांच्या मदतीला रशीद धावून आला आणि त्या दोघांनी पुरात अडकलेल्या त्या सात जणांना सुखरूप बाहेर काढले. नाना कोंडे आणि रशीद हे त्या सात जणांसाठी देवदूतच ठरले.

बुधवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास खेड-शिवापूर येथील ओढ्याला पूर आला. अन्‌ काही वेळातच पाणी दर्ग्याच्या बाजूने आत घुसले. या पुराच्या पाण्याने दर्ग्याच्या मागील बाजूस राहणाऱ्या भालेराव आणि सूर्यवंशी यांच्या घरांना वेढा घातला. बचावासाठी या घरातील पुरुष, महिला आणि मुले घरावर चढून बसले. परंतु पुराच्या पाण्याचा प्रवाह प्रचंड असल्याने त्यांना ताबडतोब घरावरून बाहेर काढणे गरजेचे होते. अशा परिस्थितीत नाना कोंडे हे कमरेला दोरी बांधून त्यांना बाहेर काढण्यासाठी पाण्यात उतरले. त्यांच्या मदतीला दर्ग्यावरील स्वच्छता कर्मचारी रशीद आला. पुराचे पाणी दर्ग्याच्या दिशेने येत असल्याचे पाहून हर्शल कोंडे आणि स्वप्नील कोंडे या स्थानिक तरुणांनी तत्परतेने दर्ग्याच्या परिसरात झोपलेल्या अनेक नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविले.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pune Rains : Saved Life Of Seven People