Pune Rains : पुणे-बंगळूर महामार्गावर वाहतूक सुरळीत

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 27 सप्टेंबर 2019

पुणे बंगळूर महामार्ग बुधवारी रात्री मुसळधार पावसामुळे बंद होता. परंतु गुरुवारी हा मार्ग वाहतुकीस सुरू झाला आहे, अशी माहिती राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या वतीने देण्यात आली. त्यामुळे सातारा, कराड, कोल्हापूरकडे जाणारी वाहतूक सुरळीत झाली आहे.

वारजे माळवाडी - पुणे बंगळूर महामार्ग बुधवारी रात्री मुसळधार पावसामुळे बंद होता. परंतु गुरुवारी हा मार्ग वाहतुकीस सुरू झाला आहे, अशी माहिती राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या वतीने देण्यात आली. त्यामुळे सातारा, कराड, कोल्हापूरकडे जाणारी वाहतूक सुरळीत झाली आहे.

संततधार पावसामुळे रात्री बोगद्याजवळ दोन ठिकाणी दरड पडली होती, तसेच साताऱ्याकडे जाणाऱ्या मार्गावर पाणी वाढल्याने वाहतूक बंद केली होती. पुणे-सातारा ठेकेदार रिलायन्समधील २० जणांचे पथक मशिनरीसह येथे उपस्थित होते. तसेच पावसामुळे वाहतूक संथगतीने सुरू होती. बुधवारी दरड तातडीने काढण्याचे काम सुरू केले. अवघ्या अर्ध्या पाऊण तासात वाहतूक सुरळीत केली. गुरुवारी कुठेही महामार्गावर वाहतुकीला कुठलाही अडथळा नाही, असे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक सुहास चिटणीस यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pune Rains Traffic start on Pune-Bangalore highway