पुणे : पाण्यासाठी दापोडीकरांचे रास्ता रोको

रमेश मोरे
बुधवार, 5 डिसेंबर 2018

जुनी सांगवी : दापोडी व परिसरात गेली दहा दिवसां पासुन अनियमित कमी दाबाने पाणी पुरवठा होत असल्याने दापोडीकर व प्रभागातील नागरिक पाण्यासाठी त्रस्त झाले आहेत. दापोडी प्रभाग पाणीपुरवठ्याचा शेवटचा टप्पा आहे. गेल्या काही दिवसांपासुन अनियमित व विस्कळीत पाणीपुरवठा होत असल्याने नागरीकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत असल्याने नागरिकांनी बुधवार (ता.५) अखेर पाण्यासाठी रास्ता रोको करून आंदोलन केले.

जुनी सांगवी : दापोडी व परिसरात गेली दहा दिवसां पासुन अनियमित कमी दाबाने पाणी पुरवठा होत असल्याने दापोडीकर व प्रभागातील नागरिक पाण्यासाठी त्रस्त झाले आहेत. दापोडी प्रभाग पाणीपुरवठ्याचा शेवटचा टप्पा आहे. गेल्या काही दिवसांपासुन अनियमित व विस्कळीत पाणीपुरवठा होत असल्याने नागरीकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत असल्याने नागरिकांनी बुधवार (ता.५) अखेर पाण्यासाठी रास्ता रोको करून आंदोलन केले.

परिसरात गेली दहा दिवसांपासुन अनियमित व कमी दाबाने पाणी पुरवठा होत असल्याने दापोडीकर पाण्यासाठी त्रस्त झाले आहेत. दापोडी प्रभाग पाणीपुरवठ्याचा शेवटचा टप्पा आहे. गेली काही दिवसांपासुन अनियमित व विस्कळीत पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. 

लोकसंख्येच्या तुलनेत उपलब्ध पाणी कमी पडत आहे. दापोडीच्या पाणीप्रश्नावर तोडगा काढण्यासाठी दापोडीकर नागरीकांच्या पाणी प्रश्नासाठी स्थानिक नगरसेवक प्रतिनिधींनी यापूर्वी आंदोलनेही केलेली आहेत. सध्या गेली दहा दिवसांपासुन पाणीपुरवठा सुरळीत होत नसल्याने येथील अनेक भागात पाणी पोचत नसल्याने नागरीक रस्त्यावर उतरले होते.येथील गणेशनगर भाग, भाजी मंडई परिसर, हिंदु तेलगु चाळ,सोपान जाधव चाळ,गुलाबनगर आदी भागात पाणी कमी दाबाने येत असल्याने सर्वसामान्यांचे पाण्यासाठी हाल होत आहेत. 

पाणी पुरवठा विभागाचे ढिसाळ नियोजन
गेली दहा दिवसांपासुन दुरूस्तीच्या नावाखाली दापोडीकरांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. पर्यायी व्यवस्था नाही.दापोडीकरांचा हा नेहमीचा प्रश्न झाला अाहे.प्रशासन मात्र करू केले जाईल असे सांगुन वेळ मारून नेण्याचे काम करते.असा संतप्त सवाल नागरीकांमधुन विचारला जात आहे. पाणी टंचाईमुळे नागरीकांच्या दैनंदिन कामांवर प्रभाव पडला आहे. महिलावर्गास याचा मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.

''अपुरे पाणी येत असल्याने घरातील कामे होत नाहीत. पाण्याशिवाय काहीच करता येत नाही.''
- पुष्पा गायकवाड हिंदु तेलगु चाळ-नागरीक

''गेली दहा दिवसांपासुन कमी दाबाने पाणी पुरवठा होतोय तर कधी पाणी मिळतच नाही. यामुळे कामाचा खोळंबा होतो.''
- मंगेश काटे-भाजी मंडई परिसर 

''दापोडीकरांचा पाणी प्रश्न दिवसेंदिवस बिघडत चालला आहे.कायमस्वरूपी पाणी प्रश्न मार्गी लावावा अशी आमची मागणी आहे.''
- माई काटे नगरसेविका

''प्रशासनाकडे आम्ही वेळोवेळी पाणीप्रश्नासाठी मागणी केली आहे.यापुर्वीही आंदोलने केली आहेत.मात्र हा नेहमीचा प्रश्न बनला आहे.''
- राजु  बनसोडे, नगरसेवक

प्रशासनाने पाणी प्रश्न सोडवावा अशी आमची आग्रही मागणी आहे.
- रोहित काटे, नगरसेवक

विविध ठिकाणी गेली चारपाच दिवस दुरूस्तीची कामे सुरू होती. दुरूस्त्या  करण्यात आल्या आहेत. दापोडीत अनधिकृत नळ कनेक्शन मुळेही पाण्याचा तुटवडा जाणवतो. या परिसरात मोठ्या प्रमाणावर अनधिकृत नळ आहेत. नागरीक व लोकप्रतिनिधींनी ते नियमानुसार अधिकृतकरण्यासाठी पुढाकार घ्यावा.अनधिकृत कनेक्शनमुळे लिकेज,घाण पाण्याच्या समस्याही या भागात वाढल्या आहेत. प्रत्येक विभागास पाण्याचा लागणारा ठराविक कोटयाचा प्रस्ताव आहे.
 - रामदास तांबे, अभियंता पाणीपुरवठा विभाग महापालिका.
 

Web Title: Pune: Rasta Roko for water in Dapodi