पुणे रत्न पुरस्कार विद्या बाळ यांना प्रदान

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 27 जून 2018

पुणे - ‘‘एखाद्या क्षेत्रात आल्यानंतर प्रत्येकाचा संघर्ष वेगळा असतो. अनेक वर्ष पैसा, प्रसिद्धीपासून लांब राहून कार्यकर्त्या म्हणून काम करत राहणे कठीण असते. लढा देणाऱ्यांना ऊर्जा देण्याचे काम स्त्रियांची चळवळ करत असून, यामध्ये समाजातील विविध घटकांनी सहभाग घ्यावा,’’ असे आवाहन सामाजिक कार्यकर्त्या विद्या बाळ यांनी केले.

अभियान प्रतिष्ठानतर्फे सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांच्या हस्ते विद्या बाळ यांना ‘पुणे रत्न पुरस्कार’ प्रदान करण्यात आला, तर अभिनेत्री विभावरी देशपांडे, सई परांजपे, ऋतुजा छाब्रिया, दीपिका जोसेफ आणि स्त्री आधार केंद्राला ‘पुणे गौरव पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. या वेळी आमदार डॉ. नीलम गोऱ्हे, कर्नल संभाजी पाटील, प्रतिष्ठानचे अध्यक्ष महेश पवार, बाळासाहेब अमराळे, प्रदीप भोसले व सतीश मोहोळ उपस्थित होते. 

‘‘स्त्री चळवळीचे काम पुढे गेले असले तरी वेगवेगळ्या पद्धतीने स्त्रीवरील अत्याचाराचे प्रमाण वाढत आहे. समाजातील वाढती हिंसा, जाती-धर्म, स्त्री-पुरुष भेदभाव संपवायचा असेल तर जीवनाच्या पैलूंबाबत स्त्री दृष्टिकोन अवलंबणे आवश्‍यक आहे. माणसाने जातीच्या बळावर नव्हे तर कर्तृत्वाच्या बळावर मोठे व्हावे,’’ असा सल्ला पाटकर यांनी दिला.

Web Title: Pune Ratna award to Vidya Bal